मुंबई : सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या दोन्ही क्रिकेटपटूंनी भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिलेच, पण या दोघांच्या नावावर क्रिकेटमधले बरेच विश्वविक्रम आहेत.
सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीची पहिली भेट अंडर 14 च्या शिबिरावेळी इंदूरमध्ये झाली होती. या शिबिरामध्ये सचिन आणि सौरव हे एकाच खोलीमध्ये राहत होते.
या शिबिराच्या पहिल्याच रात्री सचिन उठला आणि खोलीमध्ये फिरून परत झोपला. दुसऱ्या दिवशीही असाच प्रकार घडल्यानंतर याबाबत सौरवनं सचिनला विचारलं, तेव्हा मला झोपेत चालायची सवय असल्याचं त्यानं दादाला सांगितलं. सचिनच्या या उत्तरानं सौरव चांगलाच घाबरला आणि शिबिर संपेपर्यंत रोज रात्री गांगुलीचं सचिनकडे लक्ष असायचं.