मुंबई : सचिन तेंडुलकरचं आत्मचरित्र 'प्लेइंग इट माय वे' या पुस्तकाचं बुधवारी मुंबईत प्रकाशन झालं, यावेळी सौरभ गांगुलीने सचिनविषयी काही गंमतीदार आठवणी सांगितल्या.
चेन्नईत एमआरएफ स्पेस फाऊंडेशनमध्ये मी आणि सचिन तेंडुलकर आम्ही रूम मेट होतो. आपण सचिनला झोपेत काही वेळ रूममध्ये चालतांना पाहिलंय, हे आपण अनुभवलंय असं यावेळी सौरभ गांगुलीने हसत-हसत सांगितलं.
सचिन रात्री उठून रूममध्ये चालायचा, आणि नंतर झोपी जायचा, हा प्रकार मला पहिल्यांदा लक्षात आला नाही, दुसऱ्या दिवशी परत असं झाल्याने मी सचिनला हे सांगितलं, मात्र दुसऱ्या दिवसापासून आपण हे आश्चर्याने पहायचो आणि सचिन मात्र शांतपणे झोपी जायचा,असं सौरभ गांगुलीने म्हटलंय.
रात्री प्रॅक्ट्रीस सकाळी मात्र डायनिंग टेबलवर डुलक्या
आत्मचरित्र प्रकाशनाच्या कार्यक्रमात हर्षा भोगले यांनी सचिनला प्रश्न विचारला, एका सामन्या दरम्यान तू डायनिंग टेबलवर झोपत होता?
यावर उत्तर देतांना सचिनने म्हटलंय, मी सिडनीत सामन्याआधी रात्री आरशात पाहून प्रॅक्टीस करत होतो, तेव्हाही माझा रूम मेट दादा (सौरभ गांगुली) होता. तो झोपेतून उठून एकटक पाहत होता.
यावर सौरभ गांगुली म्हणाला, सर्व लाईट्स सुरू असल्याने सचिनच्या प्रॅक्ट्रीसच्या टक-टक आवाजात आपल्या झोपेचं खोबरं होत होतं, तेव्हा रात्री प्रॅक्टीस करणारा सचिन मात्र सकाळी डायनिंग डेबलवर झोपेने डुलक्या द्यायचा.
सचिनची चिंता आणि सौरभची झोपमोड
एकदा मी रात्री उठून बघितलं तर सचिन काहीतरी चिंतेत होता, तो झोपलाच नव्हता, तेव्हा मी त्याला विचारलं तेव्हा त्यांने खेळण्याविषयी थोडीशी चिंता व्यक्त केली, पण त्यांच्या या चिंतेत माझी झोप उडून गेली आणि सचिन मात्र शांतपणे झोपी गेला होता, अशी गंमतशीर आठवणही यावेळी सौरभ गांगुलीने सांगितली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.