सनरायजर्स हैदराबाद-गुजरात लायन्समध्ये निर्णायक सामना

दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानामध्ये आयपीएल-9 ची दुसरी क्वालिफायर मॅच होणार आहे.

Updated: May 27, 2016, 05:26 PM IST
सनरायजर्स हैदराबाद-गुजरात लायन्समध्ये निर्णायक सामना title=

नवी दिल्ली: दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानामध्ये आयपीएल-9 ची दुसरी क्वालिफायर मॅच होणार आहे. या मॅचमध्ये गुजरात लायन्स सनराजर्स हैदराबादला भिडेल. 

सुरेश रैनाच्या नेतृत्वात खेळणारी गुजरात लायन्सनं आपल्या पहिल्याच सिझनमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केलं आणि पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान ठेवलं. पहिल्या क्वालिफायरमध्ये एबी डिव्हिलियर्सच्या वादळी खेळीमुळे आरसीबीनं गुजरातचा पराभव केला होता. त्यामुळे आता गुजरातला फायनलमध्ये जाण्यासाठी हैदराबादला हरवावं लागणार आहे.

तर हैदराबदला त्यांचा फास्ट बॉलर आशिष नेहराची कमी नक्कीच जाणवेल. पण भुवनेश्वर कुमार आणि मुस्तफिजूरमुळे हैदराबादची बॉलिंग तगडी वाटत आहे. युवराज सिंगनंही मागच्या मॅचमध्ये फॉर्ममध्ये आल्याची चुणुक दाखवली होती. 

त्यामुळे या रोमांचक मॅचमध्ये कोणाचा विजय होणार याची उत्सुकता क्रिकेट रसिकांमध्ये आहे. या मॅचमध्ये कोणतीही टीम जिंकली तरी यंदा मात्र आयपीएलला नवी चॅम्पियन टीम मिळणार हे याआधीच स्पष्ट झालं आहे.