विराट कोहलीने सिक्स ठोकत शतक केले आणि दाखवले बायसेप्स

कसोटी टीमचा कर्णधार विराट कोहली यांने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वन-डे सामन्यात चांगली खेळी केली. त्यांने सिक्स ठोकत शतक केले. शतकानंतर आपली काय ताकद आहे हे दाखवून दिले. त्याने हात वर करत बायसेप्स दाखवले.

Updated: Oct 23, 2015, 01:16 PM IST
विराट कोहलीने सिक्स ठोकत शतक केले आणि दाखवले बायसेप्स title=

चेन्नई : कसोटी टीमचा कर्णधार विराट कोहली यांने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वन-डे सामन्यात चांगली खेळी केली. त्यांने सिक्स ठोकत शतक केले. शतकानंतर आपली काय ताकद आहे हे दाखवून दिले. त्याने हात वर करत बायसेप्स दाखवले.

Media preview

बऱ्याच दिवसानंतर विराटला सूर गवसला. त्याने जोरदार बॅटींग केली. १०० रन्स केल्यानंतर विराटला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्स याने शुभेच्छा दिल्यात. शतकानंतर विराटने चाहत्यांकडे बघून बॅट उंचावून अभिवादन केले. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ३५ रन्सने विजय मिळवला.

वर्ल्ड कप २०१५नंतर पाकिस्तानविरुद्ध शतक केल्यानंतर विराटने तीन आकडी आकडा ओलंडला नव्हता. या शतकानंतर विराटने आपला आनंद अनोख्या पद्धतीने साजरा केला. १४० बॉलमध्ये त्यांने १३८ रन्स केलेत. यामध्ये त्यांने ६ फोर आणि ५ सिक्स मारलेत. ८ महिन्यानंतर हे शतक ठोकले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.