नवी दिल्ली : भारताचा वनडे कर्णधार एमएस धोनीला सराव सत्रादरम्यान दुखापत झाल्याने तो आशिया कपमध्ये खेळू शकणार नाहीये. त्याच्या जागी पार्थिव पटेलला संघात स्थान देण्यात आलेय.
बुधवारी भारताचा पहिला सामना यजमान बांगलादेशसोबत होत आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहली म्हणाला, आशिया कपमध्ये धोनी खेळेल की नाही याचा निर्णय सामन्याआधी होईल. जर तो खेळणार नसेल तर पार्थिव पटेलला कितव्या स्थानावर गोलंदाजीसाठी पाठवायचे हे ठरवावे लागेल.
आशिया कपमध्ये खेळणाऱ्या सर्वच संघ मजबूत आहेत. जे दबावातही चांगले खेळतात तो संघ जिंकतो. २७ फेब्रुवारीला भारताचा सामना पाकिस्तानशी होतोय. लोकांमध्ये या सामन्यासाठी मोठी क्रेझ असते. मात्र तरीही इतर संघाविरुद्धच्या सामन्याप्रमाणे हा सामना असेल. पाकिस्तानचा गोलंदाज महम्मद आमिरच्या संघात पुनरागमन झाल्याने आनंद झाला. गेल्या पाच वर्षात तो क्रिकेट खेळला असला तर आतापर्यंत जगातील टॉप गोलंदाजाच्या यादीत त्याने तिसरे, चौथे स्थान मिळवले असे, असे विराट पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाला.
मॅच फिक्सिंगच्या प्रकरणावरुन आमिरवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा तो संघात पुनरागमन करतोय. मात्र त्याच्या पुनरागमनवरुनही पाकिस्तानी संघात मतभेद होतायत.