मुंबई: इंग्लंड दौऱ्यात टेस्ट सीरिज आणि वनडे सीरिजमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरलेला टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहलीनं फक्त टी-20मध्ये कमाल दाखविली. भारतानं मॅच गमावली असली तरी कोहलीनं एक नवा रेकॉर्ड बनवलाय. 41 बॉल्समध्ये शानदार 66 रन्स करणारा कोहली टी-20मध्ये सर्वाधिक रन्स करणारा भारतीय ठरलाय.
विराटनं टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंहला मागे टाकलंय. टीममधून सध्या बाहेर असलेल्या युवीनं आपल्या 40 मॅचेसमध्ये 37 वेळा खेळून 968 रन्स केलेत. फॉर्ममध्ये परत येत जेव्हा इंग्लंड विरुद्ध खेळत विराटनं 62 रन्स केले तेव्हा त्यानं युवीचा रेकॉर्ड मोडला.
कोहलीनं 28 मॅचमधील 26 खेळींमध्ये 46.28च्या सरासरीनं आणि 131.7च्या स्ट्राइक रेटनं एकूण 972 रन्स केले आहेत. कोहलीला युवराज सोबत सुरेश रेनासोबत चांगलीच टक्कर मिळतेय. रैना या लिस्टमध्ये कोहलीच्या केवळ 25 रन्स मागे आहे.
टीम इंडियाचे टॉप टी ट्वेण्टी खेळाडू
खेळाडू | मॅच | खेळी | रन्स | बेस्ट | स्ट्राइक रेट | 50 |
विराट कोहली | 28 | 26 | 972 | 78 (नाबाद) | 46.28 | 9 |
युवराज सिंह | 40 | 37 | 968 | 77 (नाबाद) | 31.22 | 8 |
सुरेश रैना | 44 | 38 | 947 | 101 | 32.65 | 3 |
गौतम गंभीर | 37 | 36 | 932 | 75 | 27.41 | 7 |
एम. एस. धोनी | 50 | 45 | 849 | 48 (नाबाद) | 33.96 | 0 |
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.