अंपायनरने नॉट आऊट दिल्यानंतर विराटने केले असे अपील...

बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातील चौथ्या दिवस भारतासाठी संमिश्र ठरला.

Updated: Feb 13, 2017, 12:12 PM IST
अंपायनरने नॉट आऊट दिल्यानंतर विराटने केले असे अपील... title=

हैदराबाद : बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातील चौथ्या दिवस भारतासाठी संमिश्र ठरला.

दुसऱ्या डावात बांगलादेशचा तमीम फलंदाजी करत असताना अश्विनचा बॉल त्याच्या पॅडवर लागला. यावेळी अश्विनने आऊट म्हणून जोरदार अपील केले. मात्र अंपायरनी नॉट आऊट हा निर्णय दिला. 

मात्र या निर्णयाने कर्णधार विराट कोहलीचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्याने तातडीने डीआरएसचा निर्णय़ घेतला. अश्विनने तमीमला सहाव्या षटकातील दुसरा चेंडू टाकला. 

तो चेंडू आधी तमीमच्या बॅटला लागला त्यानंतर पॅडला लागला. हा चेंडू विराटने पकडला. अश्विनने यावर जोरदार अपील केले. मात्र अंपायरने नॉट आऊट हा निर्णय दिला. 

मात्र विराटने डीआऱएस मागितला आणि हा निर्णय भारताच्या बाजूने लागला. तमीमला तिसऱ्या अंपायरनी बाद म्हणून घोषित केले.