नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटर युवराज सिंग येत्या 30 नोव्हेंबरला अभिनेत्री हेजल कीच हिच्यासोबत लग्नबंधनात अडकतोय. गुरुवारी युवराज संसद परिसरात दिसला. त्याच्या हातात लग्नाच्या पत्रिका होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी तो संसदेत आला होता.
लग्नाच्या या निमंत्रण पत्रिकेवर युवराजनं मोदींच्या नावामध्ये चूक केली आहे. निमंत्रण पत्रिकेवर युवराजनं नरेंद्र मोदींऐवजी नरिंदर मोदी असं लिहीलं आहे. मोदींच्या चुकलेल्या या नावाचा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होतं आहे. तसंच युवराजची खिल्लीही उडवण्यात येत आहे.
Oops! Yuvraj Singh misspelt PM Narendra Modi’s name in his wedding invitation card https://t.co/q9uaIhxsG7 pic.twitter.com/7v8fmQumdd
— Voice of Trust (@thevoiceoftrust) November 25, 2016