www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट म्हणून ओळखली जाणारी ‘अमेझॉन’नं जगातील सर्वात पहिला थ्री डी डिस्प्ले स्मार्टफोन बाजारात उतरवलाय.
बुधवारी हा स्मार्टफोन अमेरिकेत लॉन्च करण्यात आला. पुढच्या महिन्यात 25 जूनपासून या फोनची शिपिंग सुरू होऊन तो ग्राहकांपर्यंत पोहचवला जाईल.
या फोनचं उल्लेखनीय वैशिष्ट्यं म्हणजे याची थ्रीडी टेक्नॉलॉजी... तुम्ही हा स्मार्टफोन तुम्हाला हवा त्या दिशेने फिरवून तुम्हाला हवा त्या अँगलनं फोटो काढू शकता... कंपनीनं यालाच ‘डायनामिक परस्पेक्टिव्ह’ असं नाव दिलंय. म्हणजे, हा कॅमेरा प्रत्येक सेकंदाला 60 इमेजेस तयार करू शकतो. यासाठी या फोनमध्ये चार फ्रंट-फेसिंग कॅमेरे बसवण्यात आलेत. यातील दोन कॅमेऱ्यांवर तुम्ही बोट ठेऊन तुमच्या चेहऱ्यासमोर फिरवला तरीही तुम्हाला तुमचं डोकं कुठंय हे हा फोन दाखवून देऊ शकतो.
म्हणजेच, शॉपिंग करताना एखादा ड्रेस घ्यायला जात असाल तर हे फिचर तुम्हाला सिलेक्शनसाठी मदत करू शकतं. किंवा
एखाद्या कार्टुंन कॅरेक्टरच्या नजरेनं तुमचं हलणारं डोकं थ्रीडी अँगलमध्ये कसं दिसेल तेही तुम्हाला हा फोन दाखवू शकतो.
`अमेझॉन फायर`चे फिचर्स...
* डिस्प्ले - 4.70 इंच
* रिझोल्युशन - 720 X 1280 पिक्सल
* स्टोरेज - 32 जीबी आणि 64 जीबी
* प्रोसेसर - 2.2 गिगाहर्टझ
* रॅम - 2 जीबी
* रिअर कॅमेरा - 13 मेगापिक्सल
* फ्रंट कॅमेरा - 2.1 मेगापिक्सल
* ऑपरेटिंग सिस्टम - अँन्ड्रॉईड
* बॅटरी - 2400 मेगाहर्टझ
तुम्ही हा फोन ऑनलाईन ऑर्डर करू शकता... या स्मार्टफोनच्या 32 जीबीसाठी 200 डॉलर्स आणि 64 जीबीसाठी 300 डॉलर्स ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. भारतामध्ये हा फोन उपलब्ध होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
व्हिडिओ पाहा -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.