फेसबुकवर आगाऊपणा केला तर...

माणसाच्या मुलभूत गरजा म्हणून अन्न, वस्त्र आणि निवारा यांना प्राधान्य होते. मात्र, मुलभूत गरजेची व्याख्या काळाबरोबर बदललेय. आता त्यात वीज, फोन, इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंगची भर पडलेय. सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुकवर तुम्हा जर आगाऊपणा केला तर तो महागात पडेल. त्यामुळे सावधान राहा.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 9, 2013, 02:28 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, लंडन
माणसाच्या मुलभूत गरजा म्हणून अन्न, वस्त्र आणि निवारा यांना प्राधान्य होते. मात्र, मुलभूत गरजेची व्याख्या काळाबरोबर बदललेय. आता त्यात वीज, फोन, इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंगची भर पडलेय. सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुकवर तुम्हा जर आगाऊपणा केला तर तो महागात पडेल. त्यामुळे सावधान राहा.
फेसबुकवर काही लोक उगाचच आपली शेखी मिरवत असतात. काहीही अपलोड केले जाते. त्याचा त्रास अनेकांना सहन करावा लागतो. आता यातून सुटका होऊ शकणार आहे. कारण फेसबुकने घेतलेल्या चाचणीतून आगाऊपणा करणाऱ्यांना धडा मिळेल, एवढं मात्र निश्चित. फेसबुकवर आगाऊपणाने स्वत:चे जास्तच कौतुक करणाऱ्या आणि करवून घेणाऱ्यांना फेसबुकवरून निरोपाचा नारळ देऊन अनफ्रेंड करतात, असे एका सर्व्हेत आढळून आले आहे.

जे लोक जरा जास्तच प्रेमळ पोस्ट टाकतात किंवा आपले स्टेट्स जास्तच अपडेट करीत राहतात अशा व्यक्तींबाबत एक उबग जाणवतो आणि त्यांना अनफ्रेंड करण्याची इच्छा होते. त्यावर आता अनेकांनी उपाय शोधलाय तो म्हणजे अनफ्रेंडचा.
एका सर्व्हेत असे दिसून आलेय ६८ टक्के लोकांनी बढाईखोर लोकांना अनफ्रेंड केले होते. त्यासाठी फेसबुकच्या ८२० युर्जसची सर्व्हेसाठी मदत घेण्यात आली. तर ६१ टक्के लोकांनी सांगितले, स्वत:चे कौतुक आणि प्रेमप्रकरणांची माहिती सतत पोस्ट करणार्या: लोकांच्या या वृत्तीला ते कंटाळले आहेत.
# इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
# झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.