www.24taas.com, वृत्तसंस्था, हैदराबाद
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकनं एक नवा धक्कादायक खुलासा केला आहे. फेसबुकवर जगभरातून सुमारे दहा कोटी डुप्लिकेट आहेत आणि त्यामध्ये भारत, तुर्कस्थान या नव्यानं विकसित होत असलेल्या देशांमध्येच डुप्लिकेट अकाउंटची संख्या अधिक आहे, अशी माहिती खुद्द फेसबुकनंच दिलीय.
फेसबुकवर प्रतिमहिना अॅक्टिव्ह असणाऱ्या यूजरची संख्या १.२८ अब्जवर पोहोचली असून, मार्चमध्ये ही संख्या १५ टक्क्यांनी वाढली आहे. या वर्षीच्या पहिल्या तिमाहीमध्ये भारत आणि ब्राझील या देशांमधील यूजरची संख्या वाढली आहे. मात्र डुप्लिकेट अकाउंटची संख्याही वाढत आहे. त्यामुळे ४.३ ते ७.९ टक्क्यांपर्यंत डुप्लिकेट अकाउंट प्रत्येक महिन्यात अॅक्टिव्ह असतात, असं फेसबुककडून सांगण्यात आले आहे. कंपनीच्या माहितीनुसार जगभरात त्यांच्या पोर्टलवर 50 लाख ते दीड कोटी नको असलेले अकाऊंटदेखील उपलब्ध आहेत.
हे असे लोक असू शकतात ज्यांनी आमच्या सेवा आणि नियमांचं उल्लंघन करत एकाहून अधिक अकाऊंट सुरु केलं आहे. फेसबुकच्या नियमानुसार, एका नावावर एकच अकाउंट असतं, त्याच यूजरचं दुसरं अकाउंट असल्यास ते डुप्लिकेट मानण्यात येतं. त्यामध्ये अन्य बनावट अकाउंटचाही समावेश आहे.
जगभरात मोबाइलवरून फेसबुकचा वापर करणाऱ्या यूजर्सच्या संख्येत ३१ मार्च २०१४ पर्यंत ३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.