बरं का, मोफत मिळणार इंटरनेट सुविधा...

आपल्याला हवी असलेली माहीती, अगदी काही सेंकदात देणारे तंत्रज्ञान म्हणजे `इंटरनेट`. या तंत्रज्ञान विश्वात इंटरनेट ही काळाची गरज झाली आहे. ही गरज ओळखून मोफत सुविधा देण्याची संकल्पना रूजत आहेत.

Updated: Feb 27, 2014, 02:18 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वॉशिग्टंन
आपल्याला हवी असलेली माहीती, अगदी काही सेंकदात देणारे तंत्रज्ञान म्हणजे `इंटरनेट`. या तंत्रज्ञान विश्वात इंटरनेट ही काळाची गरज झाली आहे. ही गरज ओळखून मोफत सुविधा देण्याची संकल्पना रूजत आहेत.
वाय-फाय सारखे जगप्रसिद्ध तंत्रज्ञानही सर्रासपणे वापरले जाते. पण ही सुविधा वापरण्यासाठी तासातासाला पैसे द्यावे लागतात. त्यामुळे अजूनही दुर्गम भागातील लोक इंटरनेटपासून वंचित आहेत. अशा लोकांना जर ही सुविधा `मोफत` मिळाली तर ! विश्वास बसत नाही ना...पण हे खरचं आहे.
न्यूयॉर्कमध्ये कार्यरत असलेल्या `मीडिया डेव्हलपमेन्ट इन्व्हेस्टमेन्ट फंड (एमडीआयएफ)` ही संस्था छोट्या उपग्रहाद्वारे `आऊटरनेट` उभारणार आहे. या आऊटरनेटमुळे इंटरनेट डाटा जगभरात `मोफत` मिळणार असल्याचे एमडीआयएफ या संस्थेने स्पष्ट केले आहे. तसेच या तंत्रज्ञानामुळे आफ्रिकेतील इंटरनेट सुविधा नसलेले गावं न्यूयॉर्क आणि टोकिओशी संपर्कात येतील.
या नवीन उपक्रमामध्ये अंतराळातील प्रक्षेपण केंद्र आणि लघू-उपग्रह समुहाला जोडले जाईल. त्यामुळे लाखो फोन आणि कॉम्प्युटरधारक इंटरनेटशी जोडतील. या नवीन सुविधेचा उपभोग सर्वांना लवकरच मिळेल, असे एमडीआयएफचा दावा आहे.