www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
स्मार्टफोनच्या दुनियेत आता मोटोरोला कंपनी उतरली आहे. या कंपनीचा `मोटो X` हा नवा स्मार्टफोन लवकरच लाँच करण्यात येणार आहे. त्यामुळे स्मार्टफोनमध्ये चलती दिसून येणार आहे.
नोकियावर मात करत सॅमसंगने स्मार्टफोनच्या दुनियेत बाजारपेठ काबीज केली. मात्र, सोनीने टक्कर देण्यास सुरुवात केली. पुन्हा बाजारात आपले पाय रोवण्यासाठी नोकियाने कंबर कसली आहे. नवे तीन स्मार्टफोन तेही अँड्रॉइड सिस्टमवर असणार आहे. आता यामध्ये मोटोरोला कंपनी उतरली आहे. मोटो X` हा नवा स्मार्टफोन भारतीय ग्राहकाच्या हातात दिसणार आहे.
`मोटो X` या स्मार्टफोनने बाजारात पुन्हा एकदा पाय रोवण्याचा मोटोरोला प्रयत्न करणार आहे. भारतात मोटो X पुढील काही आठवड्यांमध्ये लाँच करण्यात येणार असल्याचे मोबाइल विश्व काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलेय. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत स्मार्टफोनचा धुमाकूळ दिसून येणार आहे.
मोटोरोलाची विक्री सर्वात प्रथम फ्लिपकार्ट वेबसाईट पासूनच करण्यात येणार आहे. कंपनीचा नवा मोटो G हा फोन देखील असाच विक्रीस उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कंपनीने मोटो X ची किंमत जाहीर केलेली नाही. मागील वर्षी ऑगस्टमध्ये या फोनची विक्री अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, मॅक्सिको आणि लॅटीन अमेरिकेमध्ये सुरु झाली होती.
काय आहे या `मोटो X`मध्ये
- ४.७ इंच ७२०p डिस्प्ले
> १० मेगापिक्सल मेन कॅमेरा आणि २ मेगा पिक्सल फ्रंट कॅमेरा
- १.७ गीगाहर्त्झ क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन सीपीयू
- ४ जीपीयू कोअर (नॅचरल लँग्वेज प्रोसेसर कोअर आणि कन्टेक्सचुअल कम्प्युटिंग कोअर)
- २ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल स्टोरेज
- किटकॅट अँड्रॉइड सिस्टम
- २२००mAh बॅटरी क्षमता
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.