www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मोबाईल हॅन्डसेट बनविणारी भारतीय कंपनी मायक्रोमॅक्सनं आज ऑक्टा-कोर स्मार्टफोन `कॅनव्हॉस नाईट` बाजारात दाखल केलाय.
आपल्या वेबसाईटद्वारे कंपनीनं हा फोन भारतात विकण्याचा निर्णय घेतलाय. या नव्या फोनमध्ये मीडिया टेक - २ गीगाहर्टझचं ऑक्टा-कोर प्रोसेसर वापरण्यात आलाय. यामध्ये २ जीबी रॅम आणि ५ इंचाचा स्क्रीन, फुल हायडेफिनेशनसहीत डिस्प्ले आहे.
मायक्रोमॅक्सचा सह-संस्थापक राहुल शर्मा यांनी एका मुलाखतीदरम्यान, कॅनव्हॉस नाईट कंपनीसाठी एक मैलाचा दगड ठरू शकेल, असा विश्वास व्यक्त केलाय. या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आहे. कॅमेऱ्याला व्हॉईस कमांडची सुविधाही यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलीय.
अँन्ड्रॉईड २.२ जेलीबीन ऑपरेटींग सिस्टमवर हा फोन चालतो. यामध्ये २३५९ एमएएचची बॅटरी आहे. या फोनमध्ये ३२ जीबीची इंटरनल मेमरी आहे.
या मोबाईलसाठी तुम्हाला १९,९९९ रुपये मोजावे लागतील.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.