www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
मोबाईल कंपन्यांमध्ये ग्राहकांना विविध फिचर्स देण्यावरुन आता चांगलीच स्पर्धा सुरू आहे. नोकिया आता कमी किमतीतील मोबाईल हॅन्डसेटमध्ये ‘व्हाट्स अॅप’ उपलब्ध करून देणार आहे.
नोकियाचा ‘आशा- ५००’ हा मोबाईल हॅन्डसेट येत्या काही दिवसातच ‘व्हाट्स अॅप’ या मोबाईलवरील लोकप्रिय अॅप सह बाजारात दाखल होणार आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा मात्र कंपनीतर्फे करण्यात आलेली नाही. नवीन हॅन्डसेट बद्दल माहिती देण्याऱ्या एका संकेतस्थळावर याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
या हेन्डसेटचं चित्र देखील या संकेतस्थळावर टाकण्यात आलंय. यात मोबाईलच्या स्क्रिनवर ‘व्हाट्स अॅप’चा लोगो दिसत आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या ‘आशा ५००’ प्रमाणंच या फोनची वैशिष्टय असतील. नवीन ‘आशा ५००’ या मोबाईल हॅन्डसेटमध्ये दोन सिम कार्ड वापरता येणार आहेत आणि हा फोन ‘३जी’ तंत्रज्ञानावर आधारित असेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.