पाहा... दुष्काळात करपणाऱ्या जनतेच्या मंत्र्यांचा थाट!

एकीकडं दुष्काळानं महाराष्ट्र होरपळत असताना दुसरीकडं कोकणातील राष्ट्रवादीचे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधवांनी मात्र आपल्या मुला-मुलींच्या लग्नावर लाखो रुपयांचा चुराडा केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 14, 2013, 08:20 AM IST

www.24taas.com, चिपळूण
एकीकडं दुष्काळानं महाराष्ट्र होरपळत असताना दुसरीकडं कोकणातील राष्ट्रवादीचे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधवांनी मात्र आपल्या मुला-मुलींच्या लग्नावर लाखो रुपयांचा चुराडा केलाय.
या शाही लग्न सोहळ्यासाठी मोठा मंडप साकारण्यात आला असून त्याच्या सजावटीवर पाण्यासारखा पैसा ओतण्यात आलाय. राज्याच्या अनेक भागात दुष्काळ पडल्यामुळं तिथल्या जनतेला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडलेली असताना मंत्री महोदयांनी ७० हजार नागरिकांच्या भोजनाचा बेत रचला होता. दुष्काळी भागासाठी पै-पैची मदत व्यक्ती, संस्था, देवस्थानं करत आहेत. याचा आदर्श घेण्याऐवजी मंत्री शाही लग्न सोहळ्यावर लाखोंचा चुराडा करतायत.

राज्यातल्या निम्या भागातील जनता दुष्काळाचे चटके सहन करतीय. शाही विवाह सोहळा चिपळूणच्या ताज हॉटेलमध्ये सुरु होता. दीड लाख स्क्वेअर फूट जागेत हा सोहळा पार पडला. यात जवळपास ७० हजार लोक बसतील अशी सोय या ठिकाणी करण्यात आली होती. विवाहाचा भव्य सेट खास पुण्यातील कारागिरांनी उभारला आहे. २० हेलिपॅडची व्यवस्थाही याठिकाणी करण्यात आली होती. सकाळपासून अनेक दिग्गज मंत्री या विवाह सोहळ्याला उपस्थित होते.