www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई
कोकणात पर्यावरणपूरक उद्योगांची आवश्यकता आहे. अशा उद्योगांना ऊर्जा मिळण्यासाठी जैतापूरसारखे अणू ऊर्जा प्रकल्पच उपयोगी असतील, असं पवार म्हणालेत. कोकणात पर्यटन विकासासाठी महामार्ग तसंच जलमार्ग विकास होणे आवश्यक आहे असं पवार म्हणाले.
नवी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या ग्लोबल कोकण महोत्सवाचे उदघाटन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केलं. उदघाटन सोहळ्याप्रसंगी कोकणातील सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या महोत्सवामध्ये साहसी क्रीडा प्रकार, अवकाशविश्व आणि मत्स्य व्यवसायाची माहिती उपलब्ध होणार आहे.
कोकणातील गावांचा तसंच पर्यटनस्थळांचा देखावाही या महोत्सवात पाहायला मिळणार आहे. या महोत्सवात नवी मुंबईच्या बिल्डर असोसिएशनच्या प्रदर्शनाचेही उदघाटन झालं. कोकणभूमी प्रतिष्ठान तर्फे १४ ते १७ तारखेदरम्यान भव्य ग्लोबल कोकण महोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे.
यात ४०० हून अधिक उद्योजक सहभागी झाले आहेत. कोकणचे पर्यटन, खाद्य संस्कृती, कोकणातील उद्योग तसेच कोकणातील मत्स्य प्रकार पाहायला मिळणार आहेत. नवी मंबईतील सानपाडा येथे सिडको मैदानात भव्य ग्लोबल कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.