ठाण्यात महायुती विरूद्ध राष्ट्रवादी सामना

स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी ठाण्यात डावखरे विरूद्ध फाटक यांच्यात आज लढत झाली. कोणताही कटू प्रकार न होता ही निवडणूक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे याआधी चार वेळा इथून बिनविरोध निवडून गेले होते. खरं म्हणजे विधान परिषदेचे उपसभापती आणि वसंत डावखरे असं समीकरणच बनून गेलं होतं. 

Updated: Jun 3, 2016, 10:39 PM IST
ठाण्यात महायुती विरूद्ध राष्ट्रवादी सामना title=

ठाणे : स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी ठाण्यात डावखरे विरूद्ध फाटक यांच्यात आज लढत झाली. कोणताही कटू प्रकार न होता ही निवडणूक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे याआधी चार वेळा इथून बिनविरोध निवडून गेले होते. खरं म्हणजे विधान परिषदेचे उपसभापती आणि वसंत डावखरे असं समीकरणच बनून गेलं होतं. 

पण यावेळी मात्र मातोश्रीवर चक्र फिरली आणि शिवसेनेनं इथे लढण्याचा निर्धार केला. त्यामुळे काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या रविंद्र फाटक यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र बाहेरून आलेल्या रविंद्र फाटक यांना शिवसेनेतल्या काही स्थानिक निष्ठावंतांचा विरोध होता. भाजपचाही विरोध होईल अशी शक्यता व्य़क्त केली जात होती. मात्र कोणात्याही दगाफटक्याची शक्यता पालकमंत्र्यांनी फेटाळून लावलीय. 

काँग्रेसकडून राष्ट्रवादीला दगाफटका होण्याची शक्यता वर्तवली जात होती.. त्यामुळे यावेळी डावखरेंना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. बहुजन विकास आघाडीच्या पाठिंब्यावर आपण चमत्कार घडवू, असा डावखरेंना विश्वास आहे... 

सकाळच्या वेळी मतदानाला सुरूवात झाल्यावर कीचेन आणि घड्याळातून महायुती स्पाय कॅम लावत असल्याचा आरोप आघाडीकडून करण्यात आला होता. मात्र पालकमंत्र्यांनी हे आरोप फेटाळून लावले. 

आगामी काळात ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं ही लढत चांगलीच प्रतिष्ठेची केली होती. बहुजन विकास आघाडीची भूमिका, 147 अपक्षांचं संख्याबळ यासोबतच भाजपची शिवसेनेला आणि काँग्रेसची राष्ट्रवादीला कितपत साथ मिळेल या मुद्द्यांवर या निवडणुकीचे निकाल ठरणार आहेत. 6 तारखेलाच आता यासंबंधीचं चित्र स्पष्ट होईल.