राणेंना पाडणाऱ्या केसरकरांना राष्ट्रवादीचा पाठिंबा?

लोकसभा निवडणुकीत पक्षाचा आदेश न मानणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांना पक्ष पाठिशी घालणार, असे संकेत दिसून आलेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 29, 2014, 07:58 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुकीत पक्षाचा आदेश न मानणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांना पक्ष पाठिशी घालणार, असे संकेत दिसून आलेत.
नारायण राणे यांचे आरोप आम्ही गांभीर्यानं घेत नाहीत, काँग्रेसनेही त्यांचे आरोप गांभीर्याने घेतले नाहीत, असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी दीपक केसरकर यांची बाजू घेतलीय... पण, याबद्दल फारसं आश्चर्य कुणालाच वाटत नाहीय.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या पुत्राचा - निलेश राणेंचा प्रचार करण्यास सरळ सरळ नकार देत केसरकर यांनी आघाडीचा धर्म धुडकावून लावला लावला होता. याबद्दल जितेंद्र आव्हाड, अजित पवार आणि शरद पवार यांनी भेट घेऊन समजावल्यानंतरही केसरकर यांनी आपली भूमिका सोडली नाही... आणि त्यांनी राष्ट्रवादीतून आपल्या पदाचा राजीनामा देऊन टाकला.
‘कार्यकर्त्यांसाठी मी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. तसेच राणेंचा दहशतवाद संपविण्यासाठी मी लढलो. त्यात यशस्वी झालोय. मात्र, हा विजय माझा नसून येथील दहशतीचा सामना करणाऱ्या जनतेचा आहे’ अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी नितेश राणेंच्या पराभवानंतर दिली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.