www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीमुळं काँग्रेसचा पुरता सफाया झाला... आम आदमी पार्टीनं आपल्या पहिल्याच निवडणुकीत २८ जागा पटकावल्या... तर १५ वर्षांपूर्वी दिल्लीत सत्ता गमावलेल्या भाजपनं ३१ जागा मिळवल्या... मात्र एवढ्या जागा मिळवूनही भाजपला बहूमतासाठी आणखी ५ जागांची गरज आहे...
मात्र सहज पाठिंबा मिळाला तर सत्ता स्थापन करू असं दिल्ली भाजपचे प्रभारी नितीन गडकरींनी म्हटलंय. तर आम आदमी पार्टीनं आम्ही कुणाचीही साथ घेणार नाही. विरोधी पक्ष म्हणून बसू... मात्र भाजप आणि आम आदमी पार्टीच्या या ‘पहले आप पहले आप’च्या फेऱ्यात सामान्य दिल्लीकर अडकलाय... आता दिल्लीत नेमकं काय होतं... हे पहावं लागणारेय....
भ्रष्टाचारविरोधातील आंदोलन, सुरक्षा व्यवस्था अशा सगळ्या मुद्यांवर थेट दिल्लीमध्ये सत्तेच्या जवळ आम आदमी पार्टी गेली... अरविंद केजरीवाल या सगळ्यामध्ये हिरो ठरले... यावरून महाराष्ट्रातही अशाच एका केजरीवालांसारख्या व्यक्तीची गरज आहे का असा प्रश्नही निर्माण होतोय...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.