मुंबई: लग्न...विवाह... आयुष्यातील खूप महत्त्वाची आणि मोठी घटना. यानंतर दोघांचंही आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. विवाहानंतर जबाबदाऱ्या येतात... आपल्या स्वातंत्र्यावर गदा येते. पण लग्न ठरल्यावर आपल्याकडे जो वेळ असतो त्यात काही प्रश्न आपल्या पार्टनरला प्रत्येकानं विचारायला हवे... त्याचा फायदा तुमच्या पुढील आयुष्यासाठी होतो.
आणखी वाचा - लग्नानंतर लगेच चुकूनही या गोष्टी करू नका...
आपल्या पार्टनरला हे पाच प्रश्न विचारा
१. लग्न कुणाच्या दबावात येवून तर करत नाहीये ना
आजकाल अनेक मुला-मुलींचे अफेअर असतात. त्यामुळं प्रत्येकालाच लग्नापूर्वी हे लग्न तुझ्या मर्जीनंच होतंय न की कुणाचा दबाव आहे, हा प्रश्न अवश्य विचारावा. अनेक वेळा कुटुंबियांच्या दबावाला बळी पडून मुलं लग्न करतात आणि नंतर एकमेकांसोबत संतुष्ट नसल्यामुळं दोघांचंही आयुष्य बर्बाद होतं.
२. छंद आणि सवयी काय आहेत?
आपल्या पार्टनरची आवड-नावड काय, याबाबत विचारावं. असं केल्यानं अर्ध्याअधिक गोष्टी आपल्याला स्पष्ट होतील. पार्टनरला विचारावं त्यांना काय आवडतं, कशाप्रकारचे मुलं-मुली आवडतात, फिरायला जायची आवड आहे की नाही? सिगारेट, दारूची सवय आहे का?... यासर्व गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे.
आणखी वाचा - खरं प्रेम करणारेच समजू शकतील या ११ गोष्टी
३. रोमांसबद्दल काय विचार करता
हा खूप महत्त्वाचा विषय आहे... अनेक जण संकोचामुळं हा विषय टाळतात. मात्र लग्नापूर्वी आपला जोडीदार प्रेमाबद्दल काय विचार करतो हे जाणून घेणं आवश्यक आहे. लग्नापूर्वी सेक्सबद्दल पार्टनरचं काय म्हणणं आहे? लग्नानंतरही मित्र-मैत्रिणींसोबतचे संबंध तसेच ठेवणार का... जसे आता आहेत? हे प्रश्न नक्की विचारा.
४. नोकरीवाल्या मुलीचा काही प्रॉब्लेम तर नाही
आपल्यासाठी हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आपला जोडीदार करिअसमध्ये काय मिळवू इच्छितो. सोबतच जर तुम्ही मुलगी असाल तर लग्नानंतर नोकरी करायची असेल तर करू शकतो का? की पार्टनरला आवडणार नाही हे विचारून घ्यावं.
५. फॅमिली प्लानिंग
लग्नापूर्वी फॅमिली प्लानिंगबद्दल आपल्या पार्टनरचे काय विचार आहे, हे अवश्य जाणून घ्यावेत. कारण पुढे लग्नानंतर किती मुलं हवीत, हनिमूनबद्दल काय विचार आहेत. या प्रश्नांद्वारे तुमच्या दोघांचे विचार किती पटतात हे सुद्धा कळेल.
आणखी वाचा - सुंदर मुलींना सर्वसामान्य दिसणारे मुलं का आवडतात?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.