आयफोन ५ एसमध्ये खूप सूट, रिटेलर्सची मार्जिन वाढली

अॅपल इंकनं आपल्या भारतातील रिटेलर्सला आयफोन ५ एसमध्ये जबरदस्त लाभ मार्जिनची ऑफर दिलीय. सप्टेंबरपर्यंत त्यांनी १० दहा लाख आयफोनची भारतात विक्री करावी, असं कंपनीला वाटतं. कंपनीला भारतात सॅमसंगकडून तगडी टक्कर मिळतेय. 

Updated: Jul 16, 2014, 04:35 PM IST
आयफोन ५ एसमध्ये खूप सूट, रिटेलर्सची मार्जिन वाढली title=

मुंबई: अॅपल इंकनं आपल्या भारतातील रिटेलर्सला आयफोन ५ एसमध्ये जबरदस्त लाभ मार्जिनची ऑफर दिलीय. सप्टेंबरपर्यंत त्यांनी १० दहा लाख आयफोनची भारतात विक्री करावी, असं कंपनीला वाटतं. कंपनीला भारतात सॅमसंगकडून तगडी टक्कर मिळतेय. 

सांगितलं जातंय की, कंपनीनं आयफोन ५एसमध्ये आपल्या रिटेलर्संना १३ ते १५ टक्क्यांपर्यंत मार्जिन दिली आहे. म्हणजे जवळपास ७,५००रुपयांपर्यंत डिस्काऊंट. कंपनीचा १६ जीबी वाला हँडसेट ५३,५०० रुपयांमध्ये मिळतोय. 
मोबाईल फोनच्या बाजारात इतकी स्पर्धा आहे की, रिटेलर या मार्जिनचा काही भाग ग्राहकांना देऊ इच्छितात, जेणेकरून फोनची विक्री वाढेल. सध्या भारतीय बाजारात महागड्या स्मार्टफोन्सची विक्री कमी होतेय. रिटेल व्यापारी यामुळं त्रस्त आहेत आणि त्यांच्यासाठी आता उत्तम संधी आहे.  

एरवी अॅपल इंक आपल्या उत्पादनांवर ६ ते १० टक्क्यांपर्यंत मार्जिन देते. आता ही अमेरिकन कंपनी नफ्याचं मार्जिन कमी  करून विक्री वाढवण्याचा प्रयत्न करतेय. या वर्षात नऊ महिन्यांमध्ये त्यांनी भारतात ८.३ लाख आयफोनची विक्री केलीय. सप्टेंबरपर्यंत ते १० लाखांचा आकडा पार करू इच्छितात. यासाठी त्यांनी आपल्या दोन हँडसेटची किंमतही कमी केलीय. 

अॅपलच्या आयफोन ५एसची किंमत त्यांचे स्पर्धक सॅमसंग गॅलेक्सी एस ५ पेक्षा खूप जास्त आहे आणि ग्राहकांना ते जास्त आवडतेय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.