सिंबियन OS वर ३१ डिसेंबरपासून नाही चालणार Whatsapp

व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप ३१ डिसेंबरपासून बंद होणार आहे. 

Updated: Jul 13, 2016, 12:28 PM IST
 सिंबियन OS वर ३१ डिसेंबरपासून नाही चालणार Whatsapp title=

मुंबई : व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप ३१ डिसेंबरपासून बंद होणार आहे. 

सिंबियन प्लॅटफॉर्मवर ही सर्व्हिस बंद होणार आहे. यासाठी व्हॉट्सअॅपने सिंबियन यूजर्सना नोटिफिकेशन पाठवायला सुरुवात केलीये. २०१६च्या अखेरपर्यंत सिंबियन प्लॅटफॉर्मवर व्हॉट्सअॅप बंद केले जाणार असल्याची घोषणा व्हॉट्सअॅपने केली होती. 

मार्चमध्ये व्हॉट्सअॅपने २०१६नंतर व्हॉट्सअॅप अनेक मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमला सपोर्ट करणे बंद करेल अशी घोषणा केली होती. या यादीत ब्लॅकबेरी आणि नोकियाच्या ऑपरेटिंग सिस्टीमव्यतिरिक्त अँड्रॉईड आणि विंडोज osच्या जुन्या व्हर्जनचा समावेश होता.