न्यूयॉर्क : सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकनं आपल्या मॅसेंजर सेवेला आणखी एक नवं आणि आकर्षक फीचरची जोड दिलीय. मॅसेंजरवर उपयोगकर्ता आता व्हॉईस क्लिप (ऑडिओ क्लिप)चाही वापर करू शकणार आहेत.
ऑडिओ क्लिप पाठवण्यासाठी मायक्रोफोन आयकॉन दाबावं लागेल. त्यानंतर ऑडिओ मॅसेज रेकॉर्ड करून एकमेकांना पाठवला जाऊ शकतो. परंतु, या फिचरचा वापर सध्या सगळेच वापरकर्ते करू शकणार नाहीत. कारण ही सुविधा सध्या केवळ टेस्ट ग्रुपलाच दिलेली आहे.
फेसबुकच्या मॅसेज उत्पादनांचे उपाध्यक्ष डेव्हिड मार्कस यांच्या म्हणण्यानुसार, फेसबुकनं नेहमीच मॅसेंजरचा अधिकाधिक उपयोगी बनवण्यासाठी प्रयत्न केलेत. फेसबुकचं हे नवं फिचर उपयोगकर्त्यांना टेक्स्ट टायपिंग केल्याशिवाय ऑडिओ क्लिपच्या रुपात मॅसेज पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देतात.
उल्लेखनीय म्हणजे, काही महिन्यांपूर्वी फेसबुकनं मॅसेंजर सेवेला वेगळं केलं होतं. उपयोगकर्ते याअगोदर एकाच अॅपवर (फेसबुक) चॅटींग आणि स्टेटस अपडेट करू शकत होते. परंतु, आता चॅटिंगसाठी त्यांना फेसबुक मॅसेंजर अॅप इन्स्टॉल करावा लागेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.