फेसबुक युजरसाठी गुड न्यूज

फेसबुक युजरसाठी गुड न्यूज आहे. फोटो अपलोडसाठी आणि एडिटसाठी नवा पर्याय आणला आहे. त्यामुळे सहज हवा तसा फोटो लोड करु शकता.

Updated: Dec 20, 2014, 09:50 PM IST
फेसबुक युजरसाठी गुड न्यूज title=

नवी दिल्ली : फेसबुक युजरसाठी गुड न्यूज आहे. फोटो अपलोडसाठी आणि एडिटसाठी नवा पर्याय आणला आहे. त्यामुळे सहज हवा तसा फोटो लोड करु शकता.

फेसबुकवर फोटो अपलोड करण्यासाठी नेहमीच तुम्ही त्या फोटोला एडिट करता. त्याचा रंग, ब्राइटनेस, इत्यादी गोष्टी बदलता आणि मग तो  फोटो तुम्ही फेसबुकवर अपलोड करता. परंतु आता तुम्हाला हे कष्ट करण्याची गरज भासणार नाही.

कारण आता जर तुम्ही फेसबुकवर कोणता फोटो अपलोड कराल तर त्याचा कलर ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट ऑटोमॅटेकली चेन्ज होऊ शकतो. फेसबुकवर फोटो अपलोड करण्यापूर्वी तुम्ही एडिटचा ऑप्शन निवडून तुमचा फोटो हवा तसा एडिट करून पाहू शकता.

या नव्या ऑप्शनचा तुम्ही खूप आनंद घेऊ शकता आणि तुमचे फोटो्स आणखीन सुंदर आणि आकर्षक बनवू शकता.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.