व्हॉट्सअॅपने दिली ही खुशखबर, आखणी एक नवे अॅप लॉन्च

सोशल मीडियावर व्हॉट्सअॅपची चलती आहे. आपल्या यूजर्सला खूश करण्यासाठी व्हॉट्सअॅपने आता डेस्कटॉप अॅप लॉन्च केलेय. त्यामुळे घरी मोबाईलवर आणि ऑफिसमध्ये डेस्कटॉपवर हे नवे अॅप वापरता येणार आहे. 

Updated: May 12, 2016, 07:28 PM IST
व्हॉट्सअॅपने दिली ही खुशखबर, आखणी एक नवे अॅप लॉन्च title=

मुंबई : सोशल मीडियावर व्हॉट्सअॅपची चलती आहे. आपल्या यूजर्सला खूश करण्यासाठी व्हॉट्सअॅपने आता डेस्कटॉप अॅप लॉन्च केलेय. त्यामुळे घरी मोबाईलवर आणि ऑफिसमध्ये डेस्कटॉपवर हे नवे अॅप वापरता येणार आहे. 

व्हॉट्सअॅपचं हे डेस्कटॉप अॅप वेब व्हॉट्सअॅपसारखेच काम करणार आहे. व्हॉट्सअॅपचे हे नवे डेस्कटॉप अॅप Windows 8 आणि त्यापुढील ओएस तर Mac 10.9 आणि त्यापुढील ओएस या सिस्टिमवर काम करेल.

व्हॉट्सअॅपचं डेस्कटॉप अॅप डाऊनलोड करण्यासाठी आपल्या डेस्कटॉप ब्राऊजरवरुन https://www.whatsapp.com/download या लिंकवर जा आणि अॅप इन्स्टॉल करा. त्यानंतर व्हॉट्सअॅपचा तुम्ही वापर करु शकता.