मुंबई : लग्नसोहळा हा आयुष्यातील मोठा सोहळा मानला जातो. या दिवसाच्या अनोख्या आठवणी जपण्याचा प्रत्येक जोडपे प्रयत्न करत असते. मात्र वेगळं काही करण्याच्या नादात अनेकदा सोहळ्यादरम्यान फजितीही उडते.
असंच काहीसं या व्हिडीओत दाखवलेल्या लग्नसोहळ्यात घडलंय. वर वधूला वरमाला घालत असताना वराच्या मित्रांनी त्यांच्या तोंडावर इतका स्नो स्प्रे मारला की त्याला वधू दिसतच नव्हती.