गूड न्यूज: आयफोन 6, 6+ भारतात आला रे आला!

आयफोन प्रेमींसाठी खूशखबर आहे.... आयफोन 6 आणि आयफोन 6 प्लसची भारतात विक्री सुरू झालीय. काल मध्यरात्रीपासून भारतात आयफोन 6 आणि आयफोन 6 प्लस भारतात उपलब्ध झालाय.

Updated: Oct 17, 2014, 03:49 PM IST
गूड न्यूज: आयफोन 6, 6+ भारतात आला रे आला!

मुंबई: आयफोन प्रेमींसाठी खूशखबर आहे.... आयफोन 6 आणि आयफोन 6 प्लसची भारतात विक्री सुरू झालीय. काल मध्यरात्रीपासून भारतात आयफोन 6 आणि आयफोन 6 प्लस भारतात उपलब्ध झालाय.

यावेळी स्टोअरबाहेर ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. अॅपलनं आतापर्यंत 50 ते 55 हजार हँडसेट्स भारतात पाठवलेत. त्यामुळे प्री बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना लवकरात लवकर उपलब्ध होणार आहे. 

भारतात आयफोन 6 आणि आयफोन 6 प्लसची मोठी मागणी दिसून येतेय. या आठवड्यात तब्बल 21 हजार हँडसेट्सचं प्री-बुकिंग झालंय. भारतात आयफोन 6 आणि आयफोन 6 प्लसची किंमत 53 हजार 500 ते 80 हजार 500 रुपयांदरम्यान असणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.