नवी दिल्ली : लग्नाआधी प्रत्येक मुलीला होणाऱ्या नवऱ्याबाबतच्या अनेक लहानसहान गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. अरेंज मॅरेजमध्ये केवळ एका भेटीत मुलगा-मुलगी एकमेकांबद्दल जाणून घेऊ शकत नाही. त्यामुळेच लंडनमध्ये राहणाऱ्या नाजरीनने अनोख्या पद्धतीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याची परीक्षा घेतली.
बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर नाजरीनने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला प्रश्न विचारणारे तब्बल 80 ईमेल केले. नोकरी करणाऱ्या महिलांबाबत काय विचार आहेत? लग्नानंतर मुलं कधी हवीत? असे आणि बरेच प्रश्न तिने होणाऱ्या नवऱ्याला विचारले.
ऑगस्टमध्ये लग्नानंतर दुबईला शिफ्ट झालेल्या नाजरीनने 10 डिसेंबरला ही पोस्ट फेसबुकवर टाकली. नाजरीनच्या या पोस्टला हजारो लाईक्स मिळालेत. तसेच ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली.