मुंबई : स्वप्नांची नगरी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईत मुली-महिला एकट्या-दुकट्या राहत असतील, तर त्यांना कोण-कोणत्या दिव्यांना सामोरं जावं लागतं, हे त्यांच्याच तोंडून ऐकण्यासाठी तुम्हाला 'बॅचलर गर्ल्स' ही डॉक्युमेंटरी पाहावी लागेल.
कामासाठी आपलं घर, आई-वडील सोडून मुंबईसारख्या उच्चभ्रू आणि पुढारलेल्या शहरांत दाखल झालेल्या मुलींना आजही घर मिळवण्यासाठी अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. शिखा मेनन यांनी याच्या मागची काही नेमकी कारणं एका ऑडिओ-व्हिडिओ डॉक्युमेंटरीच्या साहाय्याने समोर आणण्याचा प्रयत्न केलाय.
वर-वर पाहता ही खूप क्षुल्लक गोष्ट वाटू शकेल... पण, आज मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरांत 'बॅचलर' मुलींची ही अनेक मुलींची दुविधा बनलीय... आणि त्यांच्या स्वप्नांना या सत्याचा मात्र अडथळा ठरतोय. अगदी बॉलिवूड अभिनेत्री कल्कि कोचलीनही याला अपवाद ठरू शकली नाही.
ही डॉक्युमेंटरी सध्या चर्चेचा विषय ठरतेय.