फेसबुकवर मुलीसोबत मैत्रीकरून लावला लाखोंचा चुना

लखनऊ पोलिसांनी फेसबुकवर मुलींसोबत मैत्री करून फसवणूक करणाऱ्या एका परदेशी टोळीचा पर्दाफाश केलाय. या टोळीतील एका नायजेरियन तरूणाला एका मुलीकडून ३.५ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपात अटक केलीय. पोलीस टोळीतील इतरांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

Updated: Oct 18, 2015, 03:59 PM IST
फेसबुकवर मुलीसोबत मैत्रीकरून लावला लाखोंचा चुना  title=

मुंबई: लखनऊ पोलिसांनी फेसबुकवर मुलींसोबत मैत्री करून फसवणूक करणाऱ्या एका परदेशी टोळीचा पर्दाफाश केलाय. या टोळीतील एका नायजेरियन तरूणाला एका मुलीकडून ३.५ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपात अटक केलीय. पोलीस टोळीतील इतरांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या तरुणानं स्वत:ला इंग्लंडचा निवासी म्हणून बाराबंकीच्या तरुणीसोबत मैत्री केली आणि तिला महागडे गिफ्ट्स पाठविण्यासाठी कस्टम ड्यूटीच्या नावावर ३.५ लाखांचा चुना लावला. यानंतर पीडित तरुणीनं हजरतगंज पोलीस स्टेशनमध्ये त्याविरोधात तक्रार नोंदवली.

आणखी वाचा - सॉफ्टवेअर इंजीनिअरच लाईफ सायकल

पोलिसांनी पकडलेल्या नायजेरियन तरुणाचं नाव ओगोहो आहे. त्याला सायबर सेलच्या टीमनं पकडलं. त्याच्यावर आरोप आहे की, हॅमेन फ्रेंड नावानं फेसबुकवर फेक आयडी त्यानं बनवली. त्यावर एक इंग्रज तरुणाचा प्रोफाईल फोटो लावून भारतीय तरुणींसोबत मैत्री सुरू केली.

आरोपीनं या तरुणींना आपण इंग्लंडमधील एका नामवंत कंपनीत अधिकारी असल्याचं सांगितलं. पहिले लग्नाचं आमिष दाखवलं नंतर विदेशातून महागडे गिफ्ट देणार म्हणून लाखों रुपयांना फसवलं. फसवणूक झालेल्या तरुणीनं सायबर सेलकडे तक्रार केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. 

पीडित तरुणीनं सांगितलं, फेसबुकवर बोलतांना तिला तरुणाचा संशय आहे. तिनं त्याला भेटायला लखनऊला बोलावलं. तिला भेटायला पोहोचलेल्या नायजेरियन तरुणाला जेव्हा तिनं पाहिलं तिला विश्वासच बसला नाही. मग तिला आपली फसवणूक झाल्याचं कळलं.

आणखी वाचा - फेसबूकने DISLIKE बटण ऐवजी आणले ६ नवे इमोजी पाहा व्हिडिओ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीनं याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर सायबर सेल टीमनं तरुणीद्वारे त्याला पुन्हा बोलवलं. तो तरुण तिथं येताच त्याला पोलिसांच्या टीमनं अटक केली. आता इतरांचा शोध घेणं सुरू आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.