२९ हे वय आहे लग्नासाठी परफेक्ट वय

मुलगा किंवा मुलीचे लग्नाचे वय झाले तिला एकच प्रश्न नेहमी केला जातो ते म्हणजे लग्न कधी करतोय किंवा करतेय. तुम्हालाही हा प्रश्न कोणीतरी नक्कीच विचारला असेल. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनातून २९ वे वर्ष हे लग्नासाठी योग्य असल्याचे समोर आलेय. जाणून घ्या या मागची कारणे

Updated: Jan 23, 2017, 01:50 PM IST
२९ हे वय आहे लग्नासाठी परफेक्ट वय title=

मुंबई : मुलगा किंवा मुलीचे लग्नाचे वय झाले तिला एकच प्रश्न नेहमी केला जातो ते म्हणजे लग्न कधी करतोय किंवा करतेय. तुम्हालाही हा प्रश्न कोणीतरी नक्कीच विचारला असेल. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनातून २९ वे वर्ष हे लग्नासाठी योग्य असल्याचे समोर आलेय. जाणून घ्या या मागची कारणे

करियर - करियरच्या सुरुवातीची पाच वर्षे मोठी मेहनत घेणे गरजेचे असते. तुम्हाला २४ वर्षात नोकरी लागली तर कमीत कमी पाच वर्षे नोकरीवर पूर्ण लक्ष द्या. २९व्या वर्षापर्यंत तुमची कामावर पकड बसेल. 

स्वत:चे घर - हल्ली २४-२५व्या वयात मुला-मुलींना सहज नोकऱ्या मिळतात. त्यामुळे २९व्या वर्षापर्यंत ते स्वत:साठी लहान-मोठं घर बुक करु शकतात. 

स्वत:ला समजून घेणे गरजेचे - नोकरी लागल्यानंतर प्राथमिकता कोणत्या गोष्टीला द्यायची हे समजू लागते. स्वत:ला समजू लागतो. लग्नाआधी आपल्याला काय हवे हे समजले की कोणतेही नाते स्वीकारणे कठीण जात नाही. 

शारिरीक तसेच मानसिक तयारी - लग्नासाठी कोणत्याही मुलाने अथवा मुलीने शारिरीक तसेच मानसिकरित्या तयारी करणे गरजेचे असते.