'फेसबुक'ही साजरा करतोय 'युवा दिन'!

स्वामी विवेकानंद यांची आज जयंती (१२ जानेवारी)... याच निमित्तानं आजचा दिवस 'युवा दिन' म्हणून साजरा केला जातो. 

Updated: Jan 12, 2016, 11:38 AM IST
'फेसबुक'ही साजरा करतोय 'युवा दिन'! title=

मुंबई : स्वामी विवेकानंद यांची आज जयंती (१२ जानेवारी)... याच निमित्तानं आजचा दिवस 'युवा दिन' म्हणून साजरा केला जातो. 

आजचा दिवस भारतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातोय. फेसबुकही हा दिवस आपल्या पद्धतीनं साजरा करतोय. 

आज फेसबुक उघडल्यानंतर तुम्हाला हा फोटो आज स्वामी विवेकानंदांची जयंती असल्याची आठवण करून देईल.

स्वामी विवेकानंद यांचं खरं नाव नरेंद्रनाथ दत्त... मूळचे बंगालचे रहिवासी असलेल्या विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस यांना आपलं गुरु मानलं होतं. आपल्या गुरुंचा संदेश पोहचविण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशनची सुरुवात केली.