V R Just फ्रेंड्स- शाहरुख, प्रियांका

एक लडका और एक लडकी कभी दोस्त नही हो सकते हा फिल्मी डायलॉग आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. पण फिल्म इंडस्ट्रीतले लोकही त्याचा वापर करतात आणि अफवा पसरवतात. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. सध्या त्याचाच अनुभव शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा घेत आहेत.

Updated: Jan 11, 2012, 04:44 PM IST

www.24taas.com, मुंबई

 
एक लडका और एक लडकी कभी दोस्त नही हो सकते हा फिल्मी डायलॉग आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. पण फिल्म इंडस्ट्रीतले लोकही त्याचा वापर करतात आणि अफवा पसरवतात. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. सध्या त्याचाच अनुभव शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा घेत आहेत.

 

शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा हे दोघेही पहिल्यापासूनच एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे स्वाभाविकच भेटीगाठी, मौज मस्ती मित्र मंडळीप्रमाणेच ( इंडस्ट्रीच्या नियमानुसार नाही कारण तिथे वी आर जस्ट फ्रेंडसचा अर्थ सर्वस्वी वेगळा आहे) शाहरुख आणि प्रियांका करतात. पण त्यांच्यात निव्वळ मैत्री नसल्याच्या अफवात पसरवण्यामागे नीलम कोठारी असल्याचं उघडकीस आलं आहे.

 

या सर्व अफवा नीलम कोठारीच पसरवत असल्याचं प्रियांका चोप्राला कळलं आहे आणि त्यामुळे तिला मनस्तापाचा सामना करावा लागला आहे. नीलम ही गौरी खानची जवळची मैत्रीण आहे आणि तिने ही अफवा सर्वत्र पसरवली.

 

अर्थातच नीलमने या सगळ्याचा इन्कार केला आहे आणि आपले प्रियांका सोबत चांगले संबंध असल्याचं म्हटलं आहे. नीलमने याबाबतीतले गैरसमज दूर करण्यासाठी प्रियांकाशी संपर्क साधला असता, तिने फारसा प्रतिसाद दिला नाही. प्रियांकानेही या सगळ्या बाबतीत जाहीर वाच्यता करण्याचं टाळलं आहे.