आयपीएल सीझन दोन प्रकरणी बॉलिवुडचा बादशहा अभिनेता शाहरूख खानची तब्बल सहा तास अंमलबजावणी संचालनालयानं चौकशी केली आहे. या सहा तासांत अंमलबजावणी संचालनायानं शाहरूख खानला ७० पेक्षा जास्त प्रश्न विचारले, अशी माहिती अंमलबजावणी संचालनालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयपीएल सीझन दोनमध्ये टीममध्ये पैसे गुंतवण्यावरून शाहरूख खानला अंमलबजावणी संचालनालयाकडून प्रश्न विचारण्यात आले. कराचे स्वर्ग समजल्या जाणाऱ्या देशांकडून आयपीएल सीझन दोनच्या काही टीममध्ये पैसे लावण्यात आल्याचा आरोपावरून ही चौकशी करण्यात आली.
यामुळे अंमलबजावणी संचालनालयानं चौकशी सुरू केली आहे. अंमलबजावणी संचालनालयानं या आधी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर आणि माजी क्रिकेटर रवी शास्त्री यांचीही चौकशी केली होती.