२६/११च्या हल्ल्यात 'आयएसआय'ची मदत

२६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसएयची मदत होती, यावर अबू जिंदाल या दहशतवाद्यानं शिक्कामोर्तब केलंय. चौकशीत अबू जिंदालनं हा नवा गौप्यस्फोट केलाय.

Updated: Jul 6, 2012, 11:47 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

२६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसएयची मदत होती, यावर अबू जिंदाल या दहशतवाद्यानं शिक्कामोर्तब केलंय. चौकशीत अबू जिंदालनं हा नवा गौप्यस्फोट केलाय.

 

मुंबईवर झालेला २६/११चा भीषण हल्ला पाहून त्यामागे मोठी तयारी करण्यात आल्याचं स्पष्ट झालं होतं. तसंच दहशतवाद्यांना ट्रेनिंगही देण्यात आलं होतं. दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्र कुठून आली, हा प्रश्न अनुत्तरीत होता. मात्र, आता अटकेत असलेल्या अबू जिंदालनचं हा खुलासा केलाय. यामुळं पाकचा नापाक बुरखा पुन्हा फाटलाय. या दहशतवाद्यांना आयएसआयचा मेजर समीर बैतुल्ला यानं शस्त्रास्त्र पुरवली होती. मुंबईवर हल्ला सुरू असताना मेजर समीर कराचीतल्या कंट्रोल रूममधून दहशतवाद्यांना सूचना देत होता. हल्ल्याच्या काही दिवस आधी मेजर समीर मुजाहिद्दीन ट्रेनिंग कॅम्पमध्ये आला होता. तिथं त्यानं हल्ल्यासाठी दोन कार्टन दिल्या होत्या. डेव्हिड हेडलीही ऑगस्ट २००८ मध्ये ट्रेनिंग कॅम्पमध्ये आल्याची माहिती अबूनं दिलीय.

 

पाकिस्तानसाठी अबू महत्त्वाचा असल्यानं त्याला भारताकडे सोपवलं जाणार नव्हतं. मात्र, अबू सौदी अरेबियाला गेला आणि तिथंच त्याला अटक करण्यात आली. अबू जिंदालच्या या गौप्यस्फोटानं पाकिस्तानचं पितळ उघडं पडलंय. येत्या काळात जिंदालकडून अजून माहिती हाती येण्याची शक्यता आहे.

 

.