www.24taas.com, लंडन
एका नव्या शोधानुसार जर स्त्रियांना आपलं वजन कमी करायचं असेल, तर त्यांनी कागद-पेन घएऊन लिखाणाला सुरूवात करावी. कॅनडाच्या वॉटरलू विश्वविद्यालयाने असा दावा केला आहे की ज्या स्त्रिया आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या मूल्यांबद्दल लिखाण करतात, त्यांचं वजन घटण्याची शक्यता जास्त असते. हा शोध एका सायंस जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
शास्त्रज्ञांच्या मते ज्या स्त्रिया आपल्या आयुष्यातील नीतिमूल्यांबद्दल लिखाण करतात, त्या स्त्रियांचं वजन कमी होण्याची शक्यता इतर स्त्रियांच्या तुलनेत लवकर असते. अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी आपला जाडेपणा कमी करू पाहणाऱ्या ४५ अंडरग्रॅज्युएट स्त्रियांचं विश्लेषण केलं. यातल्या ५०% स्त्रियांना त्यांच्या आयुष्य़ातल्या सर्वांत महत्त्वाच्या मूल्यांबद्दल लिखाण करायला सांगितलं. उर्वरित स्त्रियांना इतर कमी महत्त्वाच्या मूल्यांबद्दल लिहायला सांगितलं.
डेली एक्सप्रेसच्या मते ज्या स्त्रियांनी महत्त्वपूर्ण मूल्यांबद्दल लिहीलं त्यांचं वजन सरासरी ३.४१ पौंडांनी कमी झालं तर बाकीच्या स्त्रियांचं वजन मात्र २.७६ पौंडांनी वाढलं.