उमेश यादवपुढे ऑस्ट्रेलियाचे लोटांगण

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने ऑस्ट्रेलियाला दौऱ्यात झटपट तीन गडी बाद करून चमदार कामगिरी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ५१ रन्सची आघाडी मिळूनही चांगली संधी उठवता आली नाही.

Updated: Dec 28, 2011, 10:48 AM IST

झी २४ तास वेब टीम, मेलबर्न

 

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने ऑस्ट्रेलियाला दौऱ्यात झटपट तीन गडी बाद करून चमदार कामगिरी केली. त्यामुळे  ऑस्ट्रेलियाला ५१ रन्सची आघाडी मिळूनही चांगली संधी उठवता आली नाही.

 

टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव २८२ रन्सवर आटोपल्यानंतर दुसऱया डावात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने ऑस्ट्रेलियालाचे झटपट तीन गडी बाद केले. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (५ रन्स), इद कोवान (८ रन्स)),  शौन मार्शला (३ रन्स)) यादवने बाद केले तर मायकल क्लार्कला इशांत शर्माने अग्या एका रन्सवर बाद केले.

 

टीम इंडियाचा पहिला डाव २८२ रन्सवर आटोपल्यानंतर, ऑस्ट्रेलियाला ५१ रन्सवरची आघाडी मिळाली होती. ऑस्ट्रेलियाच्या बेन हिल्फेनहॉसने पाच तर पीटर सीडलने तीन गडी बाद केले.

 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात योग्य दिशेने सुरवात करणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला तोडीस तोड उत्तर दिले. यजमानांना ३३३ रन्सवर गुंडाळल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर ३ बाद २१४ अशी मजल मारताना टीम इंडियाने पहिल्या डावात आघाडी घेण्याकडे भक्कम पाऊल टाकले.

 

सेहवागचे आक्रमक अर्धशतक आणि त्यानंतर सचिन-द्रविड यांची शतकी भागीदारी ऑस्ट्रेलियाला सावधानतेचाच इशारा देणारी होती. सचिन ७३ रन्सवर बाद झाला होता. टीम इंडियाकडून सचिनने ७३ तर राहुल द्रवीडने ६८ व वीरेंद्र सेहवागने ६७  रन्स केल्या.