www.24taas.com,कोलकाता
मुंबई इंडियनकडून पराभव पत्करावा लागलेल्या राजस्थान रॉयल्सला दुसरा धक्का कोलकाताकडून बसला. गौतमच्या कोलकाता नाइट रायडर्सने घरच्या ईडन गार्डन मैदानावर सलग दुसरा विजयोत्सव साजरा केला. द्रविडच्या राजस्थान रॉयल्सला ५ गड्यांनी नमवून गौतमच्या कोलकाता नाइट रायडर्सने घरच्या ईडन गार्डन मैदानावर सलग दुसरा विजयोत्सव साजरा केला. युसूफ पठाण , रेयान या जोडीच्या नाबाद खेळीच्या जोरावर कोलकात्याने ५ गडी राखून विजयाचे १३२ धावांचे लक्ष्य गाठले.
राजस्थानने ५ गडी गमावून १३१ धावांची खेळी केली होती. घातक गोलंदाजी करणारा शाकीब सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. पराभवाची परतफेड करत बाजी मारण्याचे राजस्थानचे स्वप्न धुळीस मिळवले. मंगळवारच्या पहिल्या विजयाने आत्मविश्वास दुणावलेल्या कोलकात्याच्या सलामीवीर कॅलिस व बिस्ला या जोडीने दमदार सुरुवात केली.झंझावाती फलंदाजीचे प्रदर्शन करत या जोडीने अर्धशतकी भागीदारी करून विजयाचा मार्ग सुकर केला. त्याआधी द्रविडने गौतम गंभीरला (११) धावबाद करून संघाच्या विजयातला मोठा अडसर दूर केला. मात्र, कॅलिसला तिसर्या क्रमांकावर आलेल्या बिस्लाची महत्त्वाची साथ मिळाली. मात्र, ३१ धावा काढणारा सलामीवीर कॅलिस बोथाच्या चेंडूवर पायचीत झाला. त्यानंतर तिवारी व बिस्लाने संघाचा डाव सावरला.
पराभवाची वचपा काढण्यासाठी नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.सलामीच्या कर्णधार द्रविड व अजिंक्य रहाणे या जोडीने दमदार सुरुवात करून दिली. अर्धशतकी भागीदारीपासून पाच पावलांवर असतानाच रहाणेला (१९) शाकीब अल हसनने बिस्लाकरवी झेलबाद केले. त्यानंतर अवघी एक धाव काढून मनेरिया धावचीत झाला. द्रविड संयमी खेळी करत असताना दुसरीकडे होत असलेली पडझड थांबवण्यासाठी चौथ्या क्रमांकावर आलेल्या गोस्वामीने कंबर कसली. मात्र, तोही अपयशी ठरला.