मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसला व्हिस्टाडोम कोच जोडणार; 24 जूनपासून बुकिंग सुरू

मुंबई - पुणे विशेष डेक्कन एक्स्प्रेस ट्रेनला व्हिस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे. 26 जून पासून हा कोच प्रवाशांच्या सेवेत जोडला जाणार आहे. या मार्गावर प्रथमच ही ट्रेन व्हिस्टाडोम कोचसह चालणार आहे. 

Updated: Jun 23, 2021, 06:09 PM IST
मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसला व्हिस्टाडोम कोच जोडणार; 24 जूनपासून बुकिंग सुरू

मुंबई : मुंबई - पुणे विशेष डेक्कन एक्स्प्रेस ट्रेनला व्हिस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे. 26 जून पासून हा कोच प्रवाशांच्या सेवेत जोडला जाणार आहे. या मार्गावर प्रथमच ही ट्रेन व्हिस्टाडोम कोचसह चालणार आहे. 

मुंबई- गोवा मार्गावरील प्रवाशांना उपलब्ध असलेले व्हिस्टाडोम कोचमधील प्रवास करतानाचे पश्चिम घाटाचे अनुभव आता मुंबई-पुणे मार्गावरही उपलब्ध होतील.  सध्या व्हिस्टाडोम कोच मुंबई -मडगाव जन शताब्दी विशेष ट्रेनमध्ये जोडलेला आहे. 

आता मुंबई- पुणे मार्गावरील प्रवासी येथून जातांना जवळच्या माथेरान टेकडी (नेरळ जवळील), सोनगीर टेकडी (पळसधरी जवळील), उल्हास नदी (जांबरूंग जवळील), उल्हास व्हॅली, खंडाळा परिसर इ. चा आणि लोणावळा आणि दक्षिण पूर्व घाट विभागातील बोगदे आणि धबधबे या  निसर्गरम्य सौंदर्याचा व अनुभवाचा आनंद घेऊ शकतील.

 विस्टाडोम कोचच्या मूलभूत विशेष वैशिष्ट्यांमध्ये वाइड विंडो पॅन आणि काचेचे छप्पर (टॉप), फिरण्यायोग्य खुर्ची आणि पुशबॅक खुर्च्या इ. समावेश आहे.

01007 विशेष डेक्कन एक्स्प्रेस 26 जूनपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून  दररोज 7 वाजता सुटेल आणि  त्याच दिवशी 11:05 वाजता पुण्याला पोहोचेल.

 01008 डेक्कन एक्स्प्रेस विशेष 26 जूनपासून दररोज 15:15 वाजता पुण्याहून सुटेल आणि  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी 19:05 वाजता पोहोचेल.  

 थांबे : दादर, ठाणे, कल्याण, नेरळ (केवळ 01007 साठी), लोणावळा, तळेगाव, खडकी आणि शिवाजी नगर.  

 संरचना :  एक व्हिस्टा डोम, ३ वातानुकूलित चेअर कार, १० द्वितीय आसन श्रेणी, १ गार्ड ब्रेक व्हॅनसह द्वितीय आसन श्रेणी.   

 आरक्षण :  01007 व 01008 या विशेष ट्रेनचे सामान्य शुल्कासह बुकिंग सर्व पीआरएस केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर 26 जूनपासून सुरू होईल.

केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.  प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.