Chanakya Niti : घरातील 'या' बाबींमुळे कुटुंब प्रमुखावर कोसळतं आर्थिक संकट, जाणून घ्या काय ते...

Chanakya Niti: चाणक्य नीतीमध्ये सुखी, समृद्ध आणि प्रगतीचे अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत. अर्थशास्त्रपासून राजकारणाचे अनेक गुरुमंत्र आजही अनेकांना मार्गदर्शन करतात. यात कुटुंब प्रमुखाशी कसं वागलं पाहिजे याबद्दलही सांगण्यात आलं आहे. तुमच्या काही चुका हे कुटुंब प्रमुखासाठी मरण यातना ठरतात. 

Updated: Feb 23, 2023, 11:18 PM IST
Chanakya Niti : घरातील 'या' बाबींमुळे कुटुंब प्रमुखावर कोसळतं आर्थिक संकट, जाणून घ्या काय ते...  title=
Chanakya Niti your these mistakes Financial crisis falls on the head of the family in marathi

Chanakya Niti Tips: आयुष्य जगण्याचे काही नियम आणि तत्त्व असतात. आपण या तत्त्वांचं पालन केलं नाही तर आपण आणि आपलं कुटुंब संकटामध्ये येतं. आचार्य चाणक्य यांच्याबद्दलचा इतिहास फार जुना आहे. हे एक महान मुत्सद्दी, राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी जीवन जगण्याचे योग्य आणि प्रामाणिक मार्ग सांगितले. या मार्गाचा आजही प्रत्येकाच्या आयुष्यात उपयोग होतो. त्यांनी सुखी, समृद्धी आणि आनंदी जीवनाचे अनेक नियम सांगितले आहेत. तसे साधे वाटणारे हे नियम पाळल्यास आपलं आयुष्य खूप सोपं होतं. चाणक्य नीतीमध्ये अनेक नात्यांचा, राजकारणाचा अगदी आर्थिक गोष्टीं विषयीदेखील सांगण्यात आले आहे.  यामध्ये आई-वडील, मुले, पती-पत्नी, भावंड, मित्र, अगदी नोकर अशा कुटुंबातील सर्व सदस्यांशी आपलं नात आणि व्यवहार कसा असावा, याचा उल्लेख आहे. जर घरातील एखादा सदस्य चुकीच्या मार्गाने किंवा चुकीच्या लोकांनी घेरला असेल तर घराचा प्रमुखावर आर्थिक संकट कोसळतं. (Chanakya Niti your these mistakes Financial crisis falls on the head of the family in marathi )

'दुष्टा भार्या शठं मित्रं भृत्यश्चोत्तरदायकः.ससर्पे च गृहे वासो मृत्युरेव न संशयः.'  याचा अर्थ असा की आपल्या काही गोष्टी ज्या घराच्या प्रमुखासाठी विषाचं काम करतात त्याला जिवंतपणीच मरण यातना देतता, असं चाणक्य यांनी सांगितलं आहे. 

'या' गोष्टी घराच्या प्रमुखाला देतात मरण यातना

घरातील स्त्री ही सुसंस्कृत नसेल, तिचं चारित्र्या चांगलं नसेल, तर अशा स्त्रीयांमुळे कुटुंबप्रमुखाला समाजात अपमान सहन करावा लागतो. दृष्ट स्वभाव असणारी किंवा कठोर वाणी असलेली स्त्रीही त्या कुटुंबासाठी घातक असते. तिच्या अशा स्वभावामुळे कुटुंबप्रमुखावर कालांतराने मृत्यू ओढवतो, असं चाणक्य म्हणतात. 

ज्या घरातील नोकर हा अप्रामाणिक, दृष्ट आणि लोभी असतो. त्या घरातील प्रमुखासह इतर सदस्यांचा जीव कायम धोक्यात असतो. असा नोकर आपल्या कुटुंबासाठी घातक ठरतो. वेळप्रसंगी आपल्या जीवालाही धोका असतो. 

सगळ्यात महत्त्वाचं ज्या घरामध्ये विषारी प्राणी किंवा साप पाळले जातात.  त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीचा जीव नेहमीच धोक्यात असतो. दुष्ट मित्रही आपल्यासाठी विषारी सापाचं काम करतात. असे मित्र त्यांचा फायद्यासाठी तुमचं नुकसानही करु शकतात. अगदी तुमच्या जीवावरही बेतू शकतं. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)