Chandra Grahan 2022 Date: आज यंदाच्या वर्षातील शेवटचं चंद्र ग्रहण; चुकूनही करु नका ही 4 कामे

Chandra Grahan 2022 Date and Time: आज आहे वर्षातील शेवटचा चंद्र ग्रहण; 'ही' 4 कामे करत असाल तर सावधान!  

Updated: Nov 8, 2022, 10:16 AM IST
Chandra Grahan 2022 Date: आज यंदाच्या वर्षातील शेवटचं चंद्र ग्रहण; चुकूनही करु नका ही 4 कामे title=

Chandra Grahan 2022 Date and Time in India: यंदाच्या वर्षाचा अखेरचा चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर 2022 रोजी लागणार आहे (lunar eclipse november 2022). काही दिवसांपूर्वी म्हणजे 25 ऑक्टोबर रोजी वर्षातील शेवटचे सूर्य ग्रहण दिसला. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र-सूर्य ग्रहण शूभ नसतो. कारण त्याचा प्रभाव थेट आपल्या जीवनावर पडत असतो. त्यामुळे सूर्य आणि चंद्रग्रहण काळात अनेक गोष्टींची काळजी घेणं प्रचंड महत्त्वाचं असतं. त्यामळे वर्षाच्या शेवटचं चंद्र ग्रहण असल्यामुळे कोणतंही काम करताना काळजी घेतली पाहिजे. जाणून घेवू चंद्र ग्रहण काळात कोणती कामं करु नये... ( Lunar Eclipse 2022 Sutak kaal Do's and Donts to follow during chandra grahan )

कधी आहे चंद्र ग्रहण
जेव्हा चंद्र ग्रहण सुरू होतो त्यांच्या 8 तासांपूर्वी सुतक कालावधी सुरू होतो. यंदाच्या वर्षातील शेवटचं चंद्र ग्रहण मंगळवारी 8 नोव्हेंबर रोजी असणार आहे. मंगळवारी संध्याकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी चंद्र ग्रहण सुरू होणार आहे. ग्रहणाच्या 8 तास आधी म्हणजे मंगळवारी सकाळी 8 वाजता सुतक काळ सुरु होणार आहे.  (how often is a lunar eclipse)

सुतक काळात महिलांनी 'ही' कामं करु नेयत
सुतक काळाचा लोकांवर विपरीत परिणाम होतो. म्हणून सुतक काळात गरोदर महिलांनी कपडे शिवणं आणि कापणं टाळावे. तसेच त्यांनी भाज्या कापू नयेत. सुतक कालावधी चंद्रग्रहणाच्या पूर्वी सुरु होतो.. असं मत धार्मिक विद्वानांनी व्यक्त केलं आहे. (lunar eclipse today)

या उपायाने संपतो सुतक काळ 
सुतक कालावधी ग्रहणाआधी सुरु होतो, त्यामुळे लोकांनी झोपण्याची चूक करू नये. असं केल्यानं त्यांना ग्रहणच्या दुष्परिणामांना सामोरे जावं लागतं आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बिघडते. ग्रहणाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी काळात मंत्रांचा जप करावा. (total lunar eclipse)

ग्रहणा दरम्यान अन्नाचं सेवन करु नका 
सुतक मुहूर्त असताना अन्न सेवन वर्ज्य करावे. त्यांनी अन्न शिजवू नये किंवा खाऊ नये. हा नियम आजारी, वृद्ध आणि लहान मुलांना लागू होत नाही. (types of lunar eclipse)

जेवण आणि पाण्यात टाका तुळशीचं पान 
ग्रहणाचा प्रभाव घरात तयार केलेल्या अन्न आणि पिण्याच्या पाण्यावरही होतो. त्यामुळे ग्रहणाचा काळ सुरू होण्यापूर्वी तुळशीची पाने आपल्या अन्नात आणि पिण्याच्या पाण्यात टाकावीत. ग्रहणाचा काळ संपल्यावर या दोन्ही पानं अन्न आणि पाण्यातून काढून त्याचं संवन करावं.

(वरील माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे झी २४ तास याची खातरजमा करत नाही )