Horoscope 8 August 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी व्यवसायात व्यस्त असाल. कार्यक्षेत्रात सन्मान मिळेल. विचार केलेल्या कामांना सुरुवात करा, या कामांची लवकरच पूर्तता होईल.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी मनात कोणतीतरी गोष्ट घर करुन राहील. अचानक नव्या संधी तुमच्यासमोर येतील.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी काही व्यक्ती स्वत:च्या स्वार्थासाठी तुमच्यासमोर अडचणी निर्माण करण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत घाई करु नका.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी व्यवसायात काहीतरी नवं करण्याच्या नादात अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ताटकळलेली कामं पूर्ण करण्यासाठी चांगला दिवस आहे.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी सहसा कामात तुमचं लक्ष लागणार नाही. साथीदाराकडून अनपेक्षित सुखद धक्का मिळेल.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी नोकरी आणि व्यवसायामध्ये चांगले निर्णय घ्यावे लागतील. कोणत्याच बाबतीत बेजबाबदारपणा दाखवू नका.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींनी पैसे सांभाळून वापरा. मनात कोणतीतरी गोष्ट घर करुन राहील. दैनंदिन कामंही सुरळीत पार पडतील.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी दुटप्पी भूमिका घेऊच नका. तब्येतीत चढ-उतार होण्यीची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होतील.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी आखलेले बेत यशस्वी होतील. योग्यता आणि अनुभवाच्या मदतीने काम करा.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी अधिकारी तुमच्या कामाने प्रभावित असतील. कामाच्या ठिकाणी एखादी नवी सुरुवात करण्याची वेळ आहे.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर तोडगा निघेल. दिवसभर पैशांचाच विचार करत राहाल.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी अविवाहितांसाठी विवाहाचे प्रस्ताव येतील. कोणताही वाद असो, तो लवकरात लवकर मिटवण्याचा प्रयत्न कराल.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )