Iron Ring Benefits : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि हा अतिशय क्रूर ग्रह मानला जातो. असं म्हणतात की, शनिदेव न्यायदेवता असून तो तुम्हाला तुमच्या कर्माची फळ देतो. तुमचे कर्म चांगले असतील तर तुम्हाला घाबरायची गरज नाही, पण तुमचे कर्म खराब असतील तर शनिदेवाचे रुद्र रुप तुम्हाला पाहावं लागतं. शनिदेव तुमच्या कुंडलीत शुभ स्थानी असेल तर तुम्ही राजासारखे जीवन जगता. जर ते अशुभ स्थिती असेल तर राजाही भिकारी होतो, असं ज्योतिषशास्त्रात म्हणतात. म्हणून शनिदेवाला कायम प्रसन्न ठेवावं असं म्हणतात. शनिवार हा शनिदेवाचा वार असून या दिवशी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आला आहे. (Do you know the benefits of wearing a ring of Saturn But who should avoid wearing an iron ring)
शिवाय तुम्ही काही लोकांच्या बोटात लोखंडाची अंगठी पाहता. लोखंड हा शनिदेवाचा धातू मानला जातो. असं म्हणतात की, शनिदेवाची विशेष कृपा राहावी म्हणून लोखंडी अंगठी धारण केली जाते.
ज्योतिषशास्त्र पंडीत डॉ. जया मदन सांगतात की, 2024 मध्ये हे शनिदेवाच वर्ष आहे. बरेच लोक शनीच्या प्रभावाचे आणि आपल्या कर्म संतुलनाचे प्रतीक असलेल्या लोखंडी अंगठ्या घालतात. लोखंड असं धातू आहे ज्याला कोणी संपवू शकतं नाही. लोखंड फक्त स्वत:चाच नाश करु शकतो. हिंदीमध्ये एक म्हणं आहे लोहे को लोहा काटता है...
शनि काळात तुमचं आळस, तुमचं जाऊ दे अशी वृत्ती, खोटेपणा, चलाखी आणि फसवणूक ही वृत्ती तुम्हाला संपवते. बाहेरचा कुठलाही शत्रू तुम्हाला घातक ठरत नाही. पण तुमची ही वाईट वृत्तीच तुमचा घात करते.
आपल्या तळहातावर मधल्या बोटाच्या खाली असलेला माउंट शनीचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे आपल्या मधल्या बोटावर घोड्याच्या नालची अंगठी धारण करण्यात येते. घोडा हा वेग आणि स्थिरतेचं प्रतीक आहे. आपलं काम स्थिर राहो आणि त्यांना वेग मिळो. लोखंडी अंगठी घातल्याने शनिदेवापासून आपल्याला संरक्षण मिळतं.
त्याशिवाय नकारात्मक प्रभावांचा प्रतिकार कमी होतो आणि सकारात्मक कर्म संतुलन राखण्यात आणि शनीला शांत करण्यात मदत मिळते. शनिदेवाशिवाय राहू आणि केतूपासूनही आपलं संरक्षण होतं.
लोखंडी अंगठी घालण्यापूर्वी स्नान करु स्वच्छ कपडे परिधान करावे. आता शनिदेवाच्या बीज मंत्राचा जप करावा. पुरुषांनी उजव्या हाताच्या मोठ्या बोटात तर महिलांनी डाव्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी धारण करावी. ही अंगठी शनिवारी संध्याकाळीच धारण करावी.
ज्या लोकांच्या कुंडलीत बुध, शुक्र आणि सूर्य एकत्र असतील त्यांनी लोखंडी अंगठी धारण करु नये. त्याशिवाय जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीच्या 12व्या घरात बुध आणि राहू एकत्र असतील किंवा दोन्ही वेगवेगळ्या घरात दुर्बल असतील तर अशा लोकांनी बोटात लोखंडी अंगठी घालणे टाळावे. तसंच ज्या लोकांच्या कुंडलीत शनि शुभ फळ देत आहे त्यांनी लोखंडी अंगठी घालू नये, अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)