Horoscope June 2024 : जवळच्या नात्यात दुरावा, आर्थिक नुकसान; जून महिना 'या' राशीच्या लोकांसाठी अशुभ?

June Rashifal 2024 :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात गोचर करणार आहे. त्याशिवाय जून महिन्यात बुध, मंगळ, शुक्र आणि सूर्य गोचर करणार आहे. या गोचरमुळे काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: May 25, 2024, 12:26 PM IST
Horoscope June 2024 : जवळच्या नात्यात दुरावा, आर्थिक नुकसान; जून महिना 'या' राशीच्या लोकांसाठी अशुभ? title=
Horoscope June 2024

June 2024 Prediction : जून महिना सुरु होण्यासाठी काही दिवस उरले आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार येणार जून महिना अतिशय महत्त्वाचा असणार असून या महिन्यात बुध गोचरसह मंगळ, शुक्र आणि सूर्य, शनिदेवाची हालचाल होणार आहे. या ग्रहांच्या बदलामुळे मानवी जीवनावर परिणाम होणार आहे. हा परिणाम काही लोकांसाठी सकारात्मक आणि तर लोकांसाठी नकरात्मक असणार आहे. येणार जून महिना कोणत्या लोकांसाठी अशुभ ठरणार आहे. याबद्दल ज्योतिषाचार्य आणि आनंदी वास्तू आनंद पिंपळकर भाकीत केलंय. (Horoscope June 2024 Separation in close relationship financial loss June month inauspicious for these zodiac signs)

'या' राशींसाठी येणारा जून महिना अशुभ!

मिथुन रास (Gemini Zodiac)

येणारा जून महिन्यात होणाऱ्या ग्रह गोचरमुळे मिथुन राशीच्या लोकांसाठी अनेक अडचणीचा ठरणार आहे. या लोकांना जून महिन्यात सावध राहणे आवश्यक आहे. तुमची जवळची व्यक्ती तुमचा विश्वासघात करण्याच भाकीत करण्यात आलंय. या महिन्यात तुमची छोटीशीही चूक तुम्हाला महागात पडणार आहे. तुमचं अस्तत्वित खराब होण्याची शक्यता आहे. कोणाशी जून महिन्यात वाद घालू नका. कोणाशीही बोलताना कडवट बोलू नका. अन्यथा तुम्ही अडचणीत येणार आहात. गुंतवणूकदेखील जून महिन्यात टाळा. 

हेसुद्धा वाचा - जूनमध्ये लक्ष्मी नारायणसह 5 दुर्मिळ राजयोग! 'या' राशींना इंक्रीमेटसह कामात यश

कन्या रास (Virgo Zodiac)    

जून महिन्यातील ग्रह गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी नकारात्मक ठरणार आहे. तुमच्यासाठी जून महिना तणावाचा सामना करावा लागणार आहे. तुम्ही अडचणीने घेरणार आहात. त्यामुळे या महिन्यात तुम्ही विशेष काळजी घ्या. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका नाही तर तुमची फसवणूक होऊ शकते. पैशाचे व्यवहार विचारपूर्वकच करा अन्यथा अडचणी येणार आहेत. त्याशिवाय तुमची गुपिते कोणाला सांगू नका. जून महिन्यात खर्चावर नियंत्रण ठेवा नाहीतर कर्जबारी व्हाल. तुम्ही तुमच्या उत्पन्नापेक्षा कमी खर्च करणे तुमच्या हिताच ठरेल. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)