Horoscope 07 March 2022 : : कशी कराल आठवड्याची सुरुवात, कोणासाठी आजचा दिवस शुभ....जाणून घ्या

नशीबानं तुमच्यासाठी काय वाढून ठेवलंय याची उत्सुकता आहे? 

Updated: Mar 7, 2022, 08:28 AM IST
Horoscope 07 March 2022 : : कशी कराल आठवड्याची सुरुवात, कोणासाठी आजचा दिवस शुभ....जाणून घ्या  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : आठवडयाची सुरुवात करत असताना, नशीबानं तुमच्यासाठी काय वाढून ठेवलंय याची उत्सुकता आहे? जाणून घ्या तुमचं आजचं भविष्य... 

वृषभ - नोकरीच्या ठिकाणी प्रतिष्ठा आणखी उंचावेल. संतानयोग आहे. मित्र आणि कुटुंबाशी असणारं नातं आणखी घट्ट होईल. कोणावरही विश्वास ठेवायला शिका. 

मिथुन- कामानिमित्तानं प्रवासयोग आहे. आजचा दिवस तुम्हाला धनलाभाचा अनुभव देऊ शकतो. शैक्षणिक प्रगतीसाठी उत्तम दिवस. 

कर्क- आज तुमच्या हातून एखादं असं काम किंवा एखादी अशी कृती घडेल ज्यामुळं संपूर्ण कुटुंबाचं नाव उज्वल होणार आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबात सुख नांदेल. 

सिंह - वरिष्ठांचं मार्गदर्शन मागण्यास संकोच बाळगू नका. त्यांचा सल्ला आज तुम्हाला यशाच्या मार्गावर नेणार आहे. प्रगतीपथावर तुमची वाटचाल सुरु होईल. 

कन्या- खासगी आयुष्यात आनंद देणाऱ्या घटना घडतील. पण, चौफेर सतर्क राहा. साथीदाराच्या नशिबानं तुम्हाला मोठं यश मिळणार आहे. जोडीदाराचं महत्त्वा आता कळणार आहे. 

तुळ- आज गरजेपेक्षा जास्त संपात करु नका, तोटा होईल. महत्त्वाच्या व्यक्तींचा सल्ला ऐका. कोणत्याही बाबतीत घाई करु नका. 

वृश्चिक - शुभकार्यांमध्ये सहभागी व्हाल. जीर्घकाळापासून ताटकळलेल्या भेटीगाठी यानिमित्तानं होणार आहेत. धनलाभ होण्याचा योग आहे. 

धनु- आई- वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्याल. नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. वरिष्ठांची मदत होणार आहे.
 
मकर- कामकाजात तुमचं पूर्ण योगदान असणार आहे. जोडीदाराच्या साथीनं अनेक कामं शक्य होतील. कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. 

कुंभ - तुमच्या चारही बाजुंनी आनंदवार्चा कानी पडणार आहेत. आज नशिबाची साथ मिळाल्यामुळं अनेक कामं मार्गी लागणार आहेत. 

मीन- पॉलिसी, शेअर, फंड अशा ठिकाणी केलेली गुंतवणूक तुम्हाला फायद्याची ठरणार आहे. कुटुंबापासून दूर असूनही नात्याचे बंध घट्ट करणाऱ्या घटना घडतील.