Trigrahi Yog: ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रह दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येतो. प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानुसार, राशीमध्ये बदल करतात. ज्योतिष शास्त्रानुसार 17 नोव्हेंबरला सूर्य देवांनी वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. इतकंच नाही तर अनेक वर्षांनंतर या दिवशी त्रिग्रही योग तयार झाला आहे. सूर्य देवाने वृश्चिक राशीत प्रवेश केला असून त्याठिकाणी बुध आणि मंगळ आधीच उपस्थित आहेत.
सूर्य, बुध आणि मंगळाने तयार केला त्रिग्रही योग
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा ग्रहांचा राजा आहे. त्याच बुद्ध आणि मंगळ सेनापतींना ग्रहांचे राजपुत्र म्हटले आहे. वृश्चिक राशीत मंगळ, बुध आणि सूर्याच्या गोचरने त्रिग्रही योग तयार झाला आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना या त्रिग्रही योगाचा लाभ मिळणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. भागीदारीत केलेल्या व्यवसायात भरपूर यश आणि नफा मिळेल.
हा अद्भुत योगायोग मेष राशीच्या लोकांसाठी खूप फलदायी ठरणार आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळाले तर त्यांना व्यवसायातही फायदा होईल. कुटुंबात कोणत्याही प्रकारचा कलह असेल तर तो दूर होईल. वैवाहिक जीवन आनंदाने भरून जाईल. व्यवसायात खूप वेगाने प्रगती होणार आहे.
कर्क राशीच्या लोकांना यश मिळणार आहे. यावेळी तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. याशिवाय या राशीच्या लोकांचा पैसा बराच काळ अडकला असेल तर तो परत मिळण्याची शक्यता असते. या काळात तुम्ही परदेशी फिरायलाही जाऊ शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात.
17 नोव्हेंबरला बनलेला त्रिग्रही योग सिंह राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर असणार आहे. तुम्हाला पदोन्नतीसह काही मोठी जबाबदारी मिळू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या जीवन साथीदाराची साथ मिळेल. तुमच्या आयुष्यात नवीन आनंद येणार आहे.
तुमची राशी तूळ असेल तर तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायात वाढ होणार आहे. त्रिग्रही योगाचा भरपूर लाभ तुम्हाला मिळू शकतो. आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकणार आहे.
वृश्चिक राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात खूप आनंद मिळणार आहे. या राशीच्या लोकांना परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. व्यवसायात वाढ आणि आर्थिक लाभ होणार आहे. या राशीच्या लोकांना या काळात त्यांच्या जीवनात अनेक सुखद बदल दिसू शकतात. नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोक यश मिळवू शकतात.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )