Tuesday Upay: आयुष्यातील सर्वच दिवस सारखे असतात असं नाही. त्यामुळं येणारा प्रत्येक दिवस हा आपल्याला नवी संधी देणारा असेल अशाच आशेनं त्या दिवसाची सुरुवात करावी. तुम्हाला माहितीये का, ज्योतिषविद्येमध्ये (Astro) प्रत्येक दिवसाचं महत्त्वं सांगण्यात आलं आहे. मंगळवार हासुद्धा त्यापैकीच एक. या दिवशी काही पूजाविधी आणि उपायांनी तुमच्यावर मारुतीरायाची कृपा होऊ शकते.
- मंगळवारी तुळशीपत्रांची एक माळ करुन ती मारुतीला अर्पण करावी. तुळशीच्या 108 पानांची माळ विणून ती जय बजरंगबली म्हणत मारुतीला वाहावी. यामुळं मंगळाचे अशुभ परिणाम दूर होतात, शनीची कृपा होते. लहानशी तुळसही तुमच्यासाठी तारणहार ठरणार आहे. (tulsi upay for tulsi Hanuman Ji Remedies)
- कोणात्या पत्रिकेमध्ये मंगळ कमजोर आहे, तर माकड किंवा लालसर रंगाच्या गायीला भाजलेले चणे खायला द्या. शास्त्रांमध्ये सांगितल्यानुसार गायीला चणे आणि गुल खायला दिल्यामुळं सूर्यदेव प्रसन्न होतात.
- वेद- शास्त्रांमध्ये दिलेल्या माहितीनुसार ज्यांच्यावर मारुतीची कृपा असते त्यांना शनी आणि यमाची भीकी नसते. अशा वेळी शनी प्रकोपापासून वाचण्यासाठी मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात जा.
- दीर्घ काळापासून एखादी व्यक्ती आजारी असल्यास मारुतीरायाच्या मूर्तीसमोर एक पात्र ठेवाय यानंतर हनुमान बाहुक चा 26 वा किंवा 21 वा पाठ अविरत सुरु ठेवा. पाठ झाल्यानंतर भांड्यात पाणी ठेवा. आजारपण दूर होईल.
- मंगळवारच्या दिवशी मारुतीस्तोत्र पठण (Maruti stotra) करा. शत्रूवर सहज विजय मिळवता येईल. अथवा सलग 21 दिवसांसाठी बजरंगबाण पाठ (Bajrang Ban path) करा. हा पाठ एकाच ठिकाणी बसून करावा तरच योग्य फलप्राप्ती होते. या पाठाचा संकप्ल घेण्यापूर्वी सत्याच्या वाटेवर चालण्याचा संकप्ल घ्यावा.
(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)