Wearing black thread rules: काही जण हौसेपोटी काळा धागा बांधतात. तर काही जण नजर लागू नये म्हणून काळा दोरा हातात तसेच पायात बांधतात. बहुतेक लोक काळा धागा घालतात, कारण समाजात अशी धारणा आहे की हा धागा वाईट नजरेपासून आपल्याला वाचवतो. याशिवाय, शनिदेवाच्या प्रकोपापासून काळा धागा रक्षण करतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो, परंतु तरीही काही लोकांनी हा धागा घालणे टाळावे. त्यांच्यासाठी तो शुभ नसतो.
काळा दोरा हाता-पायांमध्ये बांधणे शुभ मानले जात असले तरी काही लोकांनी या धाग्यापासून दूरच राहणे चांगले. कारण काळा धागा प्रत्येकासाठी शुभ परिणाम देत नाही. अर्थात, जर कोणी काळा धागा घातला असेल तर त्याच्यावर वाईट नजर पडणार नाही किंवा त्याच्यावर वाईट शक्तींचा प्रभाव पडणार नाही. तुम्हीही काळा धागा घातला असेल तर हे जाणून घ्या. (अधिक वाचा - Shani Dev : 30 वर्षांनंतर शनीबाबत मोठा योग , 'या' राशींच्या लोकांना फायदा तर यांना त्रास )
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांनी काळा धागा घालू नये. कारण मंगळ हा वृश्चिक राशीचा स्वामी मानला जातो आणि मंगळाचा रंग लाल असतो. असे मानले जाते की मंगळ काळ्या रंगासाठी प्रतिकूल आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी काळा धागा बांधू नये. यामुळे या राशीच्या राशीच्या लोकांवर विपरीत आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतात.
मेष
मंगळ देखील मेष राशीचा स्वामी आहे. यामुळे मेष राशीच्या लोकांसाठी काळा धागा हातात किंवा पायात बांधणेदेखील फलदायी नाही आणि त्याचा विपरीत परिणाम देखील होऊ शकतो. तरीही या राशीच्या लोकांनी काळा धागा घातला तर वाईट परिणाम भोगावे लागतात.
जानकारांच्या मतानुसार या लोकांना धनहानी, प्रतिष्ठा हानीचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय आरोग्याची हानीही होऊ शकते. कुटुंबातही अशांत वातावरण निर्माण होऊ शकते.
- काळा धागा घालण्याचे नियम जाणून घ्या (Wearing Black Thread Rules)
- ज्या हातात काळा धागा बांधला असेल, तर इतर कोणत्याही रंगाचा धागा बांधणे अशुभ मानले जाते.
- शनिवार हा काळा धागा घालण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. अशा स्थितीत जेव्हाही तुम्ही काळा धागा बांधायचा असेल तर तो शनिवारी बांधा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)