Intereting Facts : देवापुढे किंवा मंदिरासमोर नारळ का फोडतात? यामागच्या कारणातही दडलाय मोठा अर्थ

Breaking Coconut : नारळ फोडताना तो नेमका कसा फोडायचा हा प्रश्न तुम्ही विचारला असेल. पण, तो नेमका का फोडतात या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केला आहे का?   

Updated: Feb 2, 2023, 11:17 AM IST
Intereting Facts : देवापुढे किंवा मंदिरासमोर नारळ का फोडतात? यामागच्या कारणातही दडलाय मोठा अर्थ  title=
why do people breaks nariyal Coconut in front of temple and god know the reason

Breaking Coconut : एखाद्या शुभकार्याची सुरुवात करणं असो किंवा मग आणखी कोणतं काम. अनेकदा नारळ फोडण्याची/ वाढवण्याची प्रथा असते. काही प्रसंगी नारळ मंदिरात किंवा काही प्रसंगी देवापुढे फोडला जातो. पण, यामागे नेमकं कारण काय आहे याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? हिंदू संस्कृतीमध्ये श्रद्धेच्या पोटी ज्या कृती केल्या जातात त्या प्रत्येक कृतीमागे एक कारण असतं. एक असं कारण ज्याचा अर्थही तितकाच महत्त्वाचा. (why do people breaks nariyal in front of temple and god know the reason )

नारळ फोडण्यामागेही असंच कारण आहे... 

मंदिरांमध्ये नारळ फोडणं हे अतिशय शुभ मानलं जातं. यामागे अनेक समजुती आहेत. थोडं मागच्या काळामध्ये डोकावलं, तर त्यावेळी सहसा देवदेवतांना मान देत असताना प्राण्यांचा बळी दिला जात होता. पण, ही हिंसा समाजातील काही घटनांना सहन झाली नाही आणि त्यांनी ही प्रथाच मोडित काढत त्याऐवजी देवदेवतांना मान म्हणून नारळ फोडण्यास सुरुवात केली. 

नारळ फोडताना मनातील ईर्ष्या नष्ट करा (breaking coconut)

नारळ फोडण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे, हे एक प्रकारे स्वत:ला मोठ्या विश्वासानं दुसऱ्याच्या थोडक्यात आपल्याला वंदनीय असणाऱ्या देवाच्या स्वाधीन करणं होय. नारळ फोडत असताना त्याच्यासोबत आपल्यात असणारा स्वाभिमान, स्वार्थ, ईर्ष्या या साऱ्या गोष्टी त्या जोरात आपटून फोडाव्यात आणि निर्मळ मनानं आपल्या स्वगृही परतावं, अशीही एक समजूत आहे. 

हेसुद्धा वाचा : Dhania Ke Upay: इवलेसे धने दूर करतील दारिद्र्य; घरात कायम नांदेल लक्ष्मी

त्यामुळं यापुढे तुम्ही कधीही देवाला मान म्हणून नारळ फोडत असाल तर, मनातील संकल्प देवापुढे सोडण्यासोबतच सर्व वाईट प्रवृत्तींचाही नाश होणारे ही बाब कधीच विसरु नका. 

मोठमोठ्या मंदिरांमध्ये फोडलेल्या नारळांचा वापर कुठे होतो 

देशात अशी अनेक मंदिरं आहेत जिथं देवाच्या नावानं नारळ वाढवले जातात. आता या इतक्या नारळांचं कार करत असतील ही मंडळी? तर काही भागांमध्ये हे नारळ त्यापासून तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये वापरले जातात. काही भागांमध्ये हे नारळ तेल काढण्यासाठी वापरात आणतात. तर काही मंदिरांमध्ये तिथं येणाऱ्या भक्तांना ते प्रसाद स्वरुपात दिले जातात.